Manasvi Choudhary
फळे ही आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतात. फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स असतात.
अनेकजण डाएटमध्ये वजन कमी करण्यासाठी आहारात नियमितपणे फळांचा समावेश करतात. परंतु, तुम्ही जर इतर कोणतेही अन्नपदार्थ न खाता रोज नियमितपणे फक्त आणि फक्त फळेच खाल्ली, तर त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो.
आहारात रोज फळे खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
फळांमध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे फक्त फळे खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते.
फळांमध्ये पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे पचनसंस्था अत्यंत तंदुरुस्त राहते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
फळांमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. जर तुम्ही दिवसभर फक्त फळेच खात राहिलात, तर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका अधिक वाढतो.
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या अभावामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे सांधेदुखी किंवा इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.