Shreya Maskar
चिंचपोकळी साऊथ मुंबईमध्ये येते. हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हा एक गजबजलेला परिसर आहे. वीकेंड तुम्ही चिंचपोकळीला ट्रिप प्लान करा.
'पेंग्विन पार्क' भायखळा (पूर्व) येथे 'वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय' (जिजामाता उद्यान) मध्ये आहे. फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट लोकेशन आहे.
राणीची बाग म्हणजेच 'वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय' होय. येथे तुम्हाला प्राणी-पक्षी पाहायला मिळतील. येथे खाण्यापिण्याची देखील उत्तम सोय आहे.
म्हातारीचा बूट हे मुंबईतील मलबार हिल येथील कमला नेहरू पार्क मधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. लहान मुलांसाठी हे मुख्य आकर्षण आहे.
दादर येथे मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क आहे. येथे अथांग समुद्रकिनारा पसरला आहे. उद्यानात बसून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. आजूबाजूला खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
दादर येथे फाईव्ह गार्डन्स आहेत. हे ऐतिहासिक ठिकाण पाच गोलाकार आणि एकमेकांशी जोडलेल्या उद्यानांचा समूह आहे. येथे विस्तीर्ण हिरवळ, शतकानुशतके जुनी सावली देणारी झाडे आणि मुलांसाठी खास खेळण्याची मैदाने आहेत.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. तुम्हाला कमी गर्दी पाहिजे असेल तर शनिवार- रविवार सोडून जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.