Shreya Maskar
पालघर जिल्ह्यातील डहाणू या किनारी शहरात, डहाणू खाडीच्या मुखाशी डहाणू किल्ला वसलेला आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे.
डहाणू किल्ला हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील १६ व्या शतकातील एक किनारी किल्ला आहे. कोकण किनारपट्टीवरील मोक्याचे सागरी व्यापार मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी याची उभारणी केली होती.
डहाणू किल्ला पोर्तुगीज वसाहतकालीन वास्तुकलेसाठी, किनारी संरक्षणाचे ठाणे म्हणून प्रसिद्ध आहे.
१७३९ मध्ये चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने हा किल्ला जिंकून घेतला. मराठ्यांच्या इतिहासातील हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
यात जाड जांभा दगडाच्या भिंती (सुमारे ११-१२ मीटर उंच आणि ३ मीटर रुंद), चार बळकट बुरूज आणि प्रवेशद्वाराजवळ प्राचीन तोफांचा समावेश आहे.
तुम्ही डहाणूपर्यंत ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर डहाणू स्टेशनला उतऱ्यावर रिक्षाने डहाणू किल्ल्यापर्यंत जाता येते.
डहाणूचा किल्ला 'जिवंत किल्ला' (living fort) म्हणून प्रसिद्ध आहे कारण, किल्ल्याचा वापर शासकीय कामांसाठी आणि दैनंदिन व्यवस्थापनासाठी सक्रियपणे केला जातो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.