Indian Railway Update Saam Tv
लाईफस्टाईल

Indian Railway Rules: रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी 'हे' 5 नियम जाणून घ्या, अन्यथा जावू शकता तुरुंगात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indian Railway Rules For Passenger

प्रत्येकजण कधी ना कधी रेल्वेने प्रवास करतो. रेल्वेमध्ये प्रवास करताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. रेल्वेचे असे अनेक नियम आहेत, जर आपण नकळत त्यांचे पालन केले नाही तर ते मोडल्यास 1000 रुपये दंड किंवा 3 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. त्यांच्याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेऊया. (latest railway update)

मोठ्या आवाजात संगीत ऐकू नका

चालत्या ट्रेनमध्ये वेळ घालवण्यासाठी लोकं मोबाईलवर वापरतात. परंतु आपण रेल्वेत मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकत नाही किंवा मोबाईल फोन वापरू शकत नाही. इतर प्रवाशांनी (Indian Railway) तक्रार केल्यास इतरांची शांतता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. याशिवाय रात्री 10 वाजल्यानंतर प्रवाशांच्या केबिनमधील लाईट केवळ अत्यावश्यक कारणांसाठी चालू करता (Railway Rules For Passenger) येतील. पुरेसा प्रकाश असताना अतिरिक्त लाईट वापरण्यास रेल्वेत मनाई आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोठ्याने बोलण्यास मनाई

रेल्वेत (Indian Railway) प्रवास करणाऱ्या लोकांना रात्री 10 वाजता आवाज करणे किंवा मोठ्याने बोलण्यास मनाई आहे. ज्यामुळे जवळपासच्या इतर प्रवाशांच्या झोपेत व्यत्यय येईल, असं वागण्यास त्यांना मनाई आहे. याशिवाय तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ट्रेन सुरू झाल्यानंतर टीटीई तिकीट तपासेल. तिकिट तपासण्यासाठी रात्री 10 नंतर टीटीईला कुणाला उठविण्यास मनाई (Railway Rules) आहे.

दारू, सिगारेटवर बंदी

रेल्वेमधून प्रवास करताना दारू, सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारचे नशा करणे हा गुन्हा आहे. याशिवाय रात्री 10 नंतर रेल्वे ऑनलाइन जेवण देत नाही. पण तुम्ही ई-कॅटरिंग सेवेवर रात्रीच्या जेवणाची प्री-ऑर्डर नक्कीच करू शकता.

ज्वलनशील पदार्थास मनाई

रेल्वे (Indian Railway) अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, तूप, तेल किंवा आग लावू शकणारं कोणतेही ज्वलनशील पदार्थ ट्रेनमध्ये नेण्यास मनाई आहे. ट्रेनच्या पॅसेंजर डब्यात तुम्ही रॉकेल तेल, एलपीजी सिलिंडर घेऊन जाऊ शकत नाही.

नुकतीच घडलेली घटना

महाबोधी एक्सप्रेस गयाहून दिल्लीला जात होती. यावेळी एका प्रवाशाने मोबाईल आणि लॅपटॉप चार्जर सॉकेटमध्ये इलेक्ट्रिक किटली लावली आणि पाणी गरम करण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळताच रेल्वेत तैनात असलेल्या आरपीएफ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून त्याला असे करण्यापासून रोखले व दंड वसूल (Railway Rules) केला. ही घटना 12 जानेवारी रोजी घडली. इलेक्ट्रिक केटलला मोबाईल सॉकेटमध्ये प्लग करता येत नाही, कारण त्याची शक्ती कमी असते.

'हा' आहे नियम

रेल्वे अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, RPF रेल्वे कायद्याच्या कलम 164 अंतर्गत वरील आरोपावर कारवाई करते. 1000 रुपयांपर्यंत दंड किंवा 3 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. दोषी आढळल्यास दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT