Shraddha Thik
भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी थांबण्याची सोय करुन देते. यासाठी प्रवाशांसाठी रिटायरिंग रुम उपलब्ध करुन देते.
IRCTC ही सोय उपलब्ध करुन देते. कोणताही प्रवाशी रिटायरिंग रुम बुक करु शकतो.
ट्रेन काही कारणामुळे एकदम उशीरा येणार असेल. त्याच रेल्वे स्टेशनवरुन काही तासानंतर दुसरी रेल्वे पकडायची असेल तर रिटायरिंग रुमची सोय फायदेशीर ठरते.
यामुळे अवघ्या काही तासांकरीता हॉटेल शोधण्याची आणि तिथे अधिक भाडे करुन राहण्याची गरज नसते.
रेल्वेच्या रिटायरिंग रुममध्ये स्वच्छता तर असतातच पण त्याठिकाणी अन्य सोयी-सुविधा पण मिळातात. हा सुविधा सुरक्षित आणि आरामदायक असतात.
रिटायरिंग रुमची किंमत अत्यंत कमी असते. आरामाच्या प्रकारानुसार, सोयी-सुविधानुसार त्यात प्रकार पडतात. त्यांची किंमत साधारणपणे 100 ते 700 रुपयांदरम्यान असते.
यामध्ये एसी, नॉन-एससी रुमचा पर्याय मिळतो. रिटायरिंग रुमची बुकिंग आयआरसीटीसीचे संकेतस्थळ अथवा एपवरुन करता येते.