IOCL Recruitment 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Indian Oil Recruitment 2023 : 10 वी पास तरुणांसाठी गोल्डन चान्स! इंडियन ऑइलमध्ये पदभरती, अर्ज कसा कराल?

कोमल दामुद्रे

IOCL Recruitment 2023 Online Application Process:

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयोसीएल (IOCL) म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये पदभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या पदभरतीसाठी १७२० पदे रिक्त आहेत. यामध्ये तंत्रज्ञ आणि ट्रेड अप्रेंटिसशिपच्या पदांसाठी भरतीच्या सूचना जारी केल्या आहेत. या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया या २१ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. अर्ज कसा कराल? अर्ज प्रक्रिया कशी असेल जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या पदांसाठी उमेदावराची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेत मिळवलेल्या गुणांवर आधारित असेल. जर उमेदवारांना पेपरमध्ये समान गुण मिळत असतील तर वयोमर्यादेच्या आधारावर निवड केली जाणार आहे. अधिकृत माहितीसाठी वेबसाइटला (Website) भेट द्यावे लागेल.

या रिक्त पदांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने उमेदवारांचे वय १८ वर्षे ते २४ वर्षे या दरम्यान असायला हवे. तसेच OBC, SC, ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट मिळेल. तसेच शिक्षणासाठी (Education) उमेदवाराने १० वी पास असून डिप्लोमा आणि आयटीआय करणे गरजेचे आहे.

या रिक्त पदांसाठी एकूण १७२० पदे भरण्यात येणार आहेत. अटेंडंट ऑपरेटरसाठी ४२१ पदे भरायची आहे. डिसिप्लीन केमिकल पदासाठी ३४५ पदे, डिसिप्लीन मेकॅनिकलसाठी १८९ पदे तर बॉयलर डिसिप्लीन मेकॅनिकलसाठी ५९ पदे भरण्यात येणार आहे.

या अर्जाची शेवटची तारीख ही २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट iocl.com भेट देऊ शकता अर्ज (Application) कसा कराल हे जाणून घेऊया

याप्रकारे करा अर्ज

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना iocl.com वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • वेबसाइटला अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना वाचा.

  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी, फोटो, आयडी प्रूफ काळजीपूर्वक अपलोड करा

  • त्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आवश्य घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT