MPSC Recruitment 2023: सुवर्ण संधी! सरकारी खात्यात 7 हजार 510 पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज

MPSC Recruitment 2023 Apply Online : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हजारो पदांची भरती सुरु झाली आहे.
MPSC Recruitment 2023
MPSC Recruitment 2023 Saam Tv
Published On

MPSC Recruitment 2023 Online Application Process:

तुम्हालाही सरकारी खात्यात काम करण्याची इच्छा असेल तर लवकरच तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हजारो पदांची भरती सुरु झाली आहे. अधिकृत वेबसाइटवरुन पदभरती विषयी माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक पदांसाठी भरती राबवली जाणार आहे. याअंतर्गत ७ हजार ५१० जागांसाठी पदभरती सुरु झाली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आला आहे.

1. अर्ज (Application) प्रक्रिया कधी?

या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया १७ ऑक्टोबरपासून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तसेच या पदांसाठी मुख्य परीक्षा (Exam) ही १७ डिसेंबरला घेतली जाईल.

2. परीक्षा केंद्र

उमेदवारांना परीक्षेसाठी अमरावती, छ.संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे केंद्र असेल.

MPSC Recruitment 2023
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023: मोठ्या ग्रहांची युती, या ५ राशींनी सावध राहा; खर्चात वाढ होण्याची शक्यता

3. वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना यांमध्ये ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

4. अर्ज शुल्क (Fees)

खुल्या प्रवर्गाकडून ५४४ रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांकडून ३४४ रुपये शुल्क घेण्यात येणार आहे.

5. पगार किती?

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला १९ ते ६० हजांरापर्यंत पगार मिळू शकतो. यामध्ये विविध खात्यानुसार पगार ठरविला जाईल.

MPSC Recruitment 2023
ESIC Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1000 पदांची भरती, कसा कराल अर्ज?

6. शिक्षणाची अट

उमेदवार पदवीधर असावा तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. वेग असणे आवश्यक आहे.

7. अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यासाठी आपण MPSC च्या अधिकृत साइटला भेट देऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com