Indian Navy Recruitment 2024 Saam tv
लाईफस्टाईल

Indian Navy Recruitment 2024 : सुवर्णसंधी! नौदलात २५४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, इतका मिळेल पगार

Indian Navy Recruitment 2024 Apply Online: पदवीधर उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदल विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशसेवा करु पाहाणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

कोमल दामुद्रे

Indian Navy Recruitment 2024 Online Application Process:

पदवीधर उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदल विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशसेवा करु पाहाणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. भारतीय नौदल अंतर्गत तब्बल २५४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्घतीने अर्ज करावा लागणार आहे.

भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन (Online) अर्ज करु शकता. अर्जाची प्रक्रिया २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अर्ज कसा कराल जाणून घेऊया.

1. पदाचे नाव - एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच

2. पदसंख्या - २५४

3. रिक्त जागा

  • सामान्य सेवा- ५०

  • पायलट, हवाई वाहतूक, नेव्हल एअर ऑपरेशन्स- ४६

  • लॉजिस्टिक - ३०

  • नौदल सुधारणा - १०

  • शिक्षण - १८

  • अभियांत्रिकी शाखा- ३०

  • विद्युत शाखा-५०

  • नौदल कन्स्ट्रक्टर - २०

4. अर्ज करण्यासाठी शैक्षणिक (Education) पात्रता

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची पात्रता बारावी (B.Tech)असणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक आहे. भारतीय नौदलातील शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्यासाठी बीएससी, बीकॉम, बीई किंवा बीटेक, एमसीए, एमएससी, एमबीए, पोस्ट ग्रॅज्युएशन, एम. मान्यताप्राप्त मंडळे किंवा विद्यापीठे शिक्षण आवश्यक आहे.

5. वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते २४ वर्षापर्यंत असायला हवे.

6. अर्ज शुल्क

या भरती प्रक्रियेसाठी कोणताही अर्ज शुल्क आकारण्यात आलेला नाही.

7. अर्ज करण्याची दिनांक

उमेदवार २४ फेब्रुवारी २०२४ ते १० मार्च २०२४ या कालावधीत अर्ज करु शकतात.

8. पगार किती?

उमेदवाराचे सिलेक्शन झाल्यास ५६१०० प्रति महिना मिळणार आहे.

9. अर्ज कसा कराल?

  • या पदभरतीसाठी अर्ज (Application) ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्ज करण्यासाठी Indiannavy.gov.in या साइटला भेट द्यावी लागेल.

  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक ते कागदपत्र सोबत जोडा तसेच अधिक माहितीसाठी PDF जाहिराती बघा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT