Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्यांनी आयुष्यात कोणाकडून अपेक्षा ठेवावी आणि कोणापासून दूर राहावं, याबाबत उत्तम मार्गदर्शन केलं आहे. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान होतं, असं चाणक्य सांगतात.
जे स्वतः काहीही करत नाहीत, पण नेहमी इतरांकडून मदतीची अपेक्षा ठेवतात, अशा लोकांच्यासोबत राहिल्याने दुःख वाढतं.
कधीही साथ न देणारे लोक गरजेच्या वेळी गायब असतात. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्याने फक्त मनस्ताप होतो.
आचार्य चाणक्यांच्या मते स्वार्थी व्यक्ती हा सर्वात मोठा शत्रू असतो. गरज संपली की नातंही संपवतात.
फायदा संपला की पाठ फिरवणाऱ्या लोकांकडून मदत किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.
चाणक्य नीतीनुसार ज्या लोकांकडे सत्ता असते. तेव्हा माणसात बदल होतो. पदावर पोहोचलेले लोक जुनं नातं विसरतात.
तोंडाने गोड बोलणारे, पण कृतीत काहीच न करणारे लोक संकटात साथ देत नाहीत.
खोटी आपुलकी दाखवणारे लोक भावनिक आधार देत असल्याचा आव आणतात, पण गरजेच्या वेळी उपयोगी पडत नाहीत.
जे पाठीमागे धोका देतात, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्याने धन, मान-सन्मान आणि नात्यांचं मोठं नुकसान होतं.