Parenting Tips: सावधान! तुम्ही तुमच्या लहान मुलांसमोर कपडे बदलता का? वाईट सवय तर लावत नाहीत ना?

Parenting Tips: पालकांकडून नकळतपणे आपल्या समोर चुका करत असतात. बहुतेकवेळा पालकांकडून झालेल्या छोट्या छोट्या चुकांचा परिणाम मुलांच्या मनावर होत असतो. त्यातील एक चूक म्हणजे पालक आपल्या मुलांसमोर कपडे बदलत असातात, त्याचाही वाईट परिणाम मुलांच्या मनावर होत असतो.
Parenting Tips:
saam tv
Published On
Summary
  • मुलांसमोर कपडे बदलणे टाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

  • छोट्या सवयींचा मुलांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम

  • पालकांनी प्रायव्हसी आणि शिस्त याबद्दल जागरूक राहणे आवश्यक

मुलांचे पालक होणं हे काही सोपे काम नाही. पालकांनी आपल्या मुलांना वाढवताना प्रत्येक लहान किंवा मोठ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अगदी थोडीशीही निष्काळजीपणा मुलाच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर खोलवर परिणाम करू शकतो. प्रसिद्ध पालकत्व (पॅरेंटिंग) प्रशिक्षक डॉ. अनुराधा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून अशाच एका साधरण वाटणाऱ्या चुकीबदद्ल माहिती दिलीय. पालकांनी कधीच आपल्या मुलांसमोर कपडे बदलू नयेत, असा सल्ला डॉ. अनुराधा यांनी त्यांच्या पोस्टमधून दिलाय. यावर अनेकजण आक्षेप घेतील पण, या मागे एक मानसशास्त्रज्ञीय कारण आहे.

Parenting Tips:
Valentine Day Love Letter: प्रवासात 'ती' आठवली अन् डोळे पाणावले! अपूर्ण प्रेमाची स्वप्ने पत्रात रंगवली

डॉ. अनुराधा म्हणतात की हा सल्ला केवळ गोपनीयतेचा विषय नाही तर मुलांच्या मनात 'शरीराच्या सीमा' ('बॉडी बाउंड्रीज')आणि 'गोपनीयता' बद्दल लवकर समज विकसित करण्यासाठी महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपल्या वागण्यात या मर्यादांचे पालन करतो तेव्हा आपण नकळत मुलाला शिकवत असतो की त्याचे शरीर खाजगी आहे आणि त्याच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे. 'जर तुमचा नवरा किंवा बायको तुमच्या लहान मुलासमोर कपडे बदलत असेल तर ते खूप मोठी चूक करत आहेत, पॅरेंटिंग प्रशिक्षक डॉ. अनुराधा यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटलंय.

Parenting Tips:
वाढतं प्रदूषण आणि ॲलर्जीक सर्दीवर कायमचा उपाय हवाय? होमिओपॅथी डॉक्टरांनी सांगितला रामबाण उपाय

नग्नता आणि गोपनीयता असा विचार आहे जो आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच शिकवल्या पाहिजेत. यामुळे त्यांना सीमा निश्चित करण्यास मदत होते. जे व्यक्ती आपल्या पाल्यांसमोर म्हणजेच मुलासमोर कपडे न बदलणारे पालक मुलांना केवळ स्वतःच्या शरीराचाच नव्हे तर इतरांच्या शरीराचाही आदर करायला शिकवतात.' सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मुलांना लैंगिक शोषणापासून संरक्षण कसं करता येईल याबाबत ही माहिती देऊ शकतात. ज्यामुळे तुम्ही एक जागरूक आणि जबाबदार पालक बनू शकाल.

मुलांसमोर कपडे न बदलण्याची ५ कारणे

शरीराच्या सीमा (बॉडी बाउंड्रीज)

मुले लहानपणापासूनच त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करून अनेक गोष्टी शिकत असतात. जेव्हा पालक त्यांच्यासमोर कपडे बदलत नाहीत, तेव्हा मुलाला असा संदेश जात असतो शरीराचे काही भाग खाजगी असतात. ते इतरांसमोर दाखवू नये. ही गोष्ट त्यांना भविष्यात स्वतःच्या आणि इतरांच्या शारीरिक मर्यादांचा आदर करायला शिकवत असते.

'गुड टच' और 'बॅड टच'

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर एखाद्या लहान मुलाला घरातल्या सर्वांना नग्न किंवा कपडे बदलताना पाहण्याची सवय झाली तर त्यांची गोपनीयता कमी महत्त्वाची होते. अशा परिस्थितीत, जर बाहेरील कोणी त्याच्याशी अनुचित वर्तन करण्याचा प्रयत्न केला तर मुले ते गांभीर्याने घेऊ शकत नाहीत, कारण ते 'एक्सपोजर' त्याला सामान्य वाटते. एकट्याने कपडे बदलण्याची सवय मुलांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक सावध करत असते.

शरीरातील फरक

मुले जसजशी मोठी होतात (विशेषतः ३ ते ६ वयोगटातील), तसतसे त्यांना स्वतःच्या आणि इतरांच्या शरीरातील फरकांबद्दल उत्सुकता निर्माण होते. डॉक्टरांच्या मते, विशिष्ट अंतर राखल्याने मुलांच्या मनात त्यांच्या शरीराबद्दल अनावश्यक गोंधळ निर्माण होत नाही. सन्माननीय आणि नैसर्गिक पद्धतीने शारीरिक विकास स्वीकारण्यास शिकत असतात.

गोपनीयता प्रायव्हसी

जेव्हा तुम्ही मुलासमोर तुमची गोपनीयता राखता तेव्हा मूलही तुमच्याकडून त्याच्या गोपनीयतेची अपेक्षा करतात. कपडे बदलताना किंवा शौचालय वापरताना दार बंद ठेवणे आवश्यक असते. तसेच दरवाजा ठोठवल्याशिवाय खोली प्रवेश करून हेदेखील मुले शिकतात.

सामाजिक शिष्टाचार

जर कपडे बदलण्याविषयी घरात कोणता नियम नसेल तर आणि मुले दुसऱ्यांच्या घरी गेले तर तेथेही याच सवयीचा अवलंब करतात. जर घरी कपडे बदलण्यावर कोणतेही बंधन नसेल, तर मुले सार्वजनिक ठिकाणी, शाळेत किंवा मित्रांच्या घरी असेच वागू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com