India Gate Rice
India Gate Rice Saam Tv
लाईफस्टाईल

India Gate Rice : इंडिया गेटला मिळाला जगातील 1 ल्या क्रमांकाचा मान, बासमती तांदूळ ब्रॅण्ड म्हणूनही मान्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

India Gate Rice : आपल्याला रोजच्या आहारात तांदळाचे (Rice) देखील विशेष महत्त्व आहे. गरम गरम वरणासोबत चवीने खाल्ला जातो तो भात. सुवासिक बासमती तांदूळ हल्ली प्रत्येकाच्या घरातील (House) महत्त्वाचा पदार्थ झाला आहे.

आघाडीच्या जागतिक एजन्सीद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात आढळले आहे की, जगभरात तांदूळ या धान्याला मागणी वाढत आहे. इंडिया गेट हा मेड-इन-इंडिया ब्रॅण्ड ९० हून अधिक देशांना दरवर्षी ८ कोटींहून अधिक पॅक्स यशस्वीरित्या निर्यात करतो. या विभागातील जागतिक अग्रणी म्हणून, प्रामुख्याने सुट्या मिळणाऱ्या अनब्रॅण्डेड विभागाचे रूपांतर ब्रॅण्डेडमध्ये करण्याच्या माध्यमातून, भारतात वाढीची इंडिया गेटची योजना आहे.

बासमती तांदळाच्या जागतिक बाजारपेठेबद्दल अलीकडेच झालेल्या एका संशोधनात्मक अभ्यासानुसार, या प्रतिष्ठेच्या तांदळाला त्याचा उच्चदर्जा, अव्वल रूप व वैशिष्ट्यपूर्ण चव यामुळे प्रचंड मागणी आहे. इंडिया गेट हा केआरबीएलचा फ्लॅगशिप ब्रॅण्ड असून एका आघाडीच्या जागतिक संशोधन कंपनीने नुकत्याच केलेल्या बाजारपेठांच्या अभ्यासात इंडिया गेटला जगातील १ल्या क्रमांकाचा बासमती तांदूळ ब्रॅण्ड म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

मॉरडोर इंटेलिजन्सच्या संख्यात्मक अभ्यासात व्हाइट व ब्राउन बासमती तांदूळ या विभागाचा अमेरिका, युरोप, आशिया-पॅसिफिक आणि मध्यपूर्व व आफ्रिका या खंडांमध्ये अभ्यास करण्यात आला. प्राथमिक व दुय्यम संशोधन, डेटा ट्रँग्युलेशन व इनसाइट जनरेशन आदी पद्धती वापरून हे संशोधन करण्यात आले.

मॉरडोर इंटेलिजन्स या आघाडीच्या जागतिक संशोधन कंपनीची स्थापना २०१४ साली झाली आणि तेव्हापासून या कंपनीने १०० हून अधिक देशातील विविध उद्योगक्षेत्रांतील ४०००हून अधिक एंटरप्रायजेसना आवश्यक माहिती पुरवण्यासाठी अभ्यासाचे उपक्रम केले आहेत.

इंडिया गेट बासमती राइस हा ब्रॅण्ड १९९८ साली स्थापन झाल्यापासून, निसर्गातील पोषणात्मक समजल्या जाणाऱ्या बासमती तांदळाच्या माध्यमातून जिभेवर चव टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांत, इंडिया गेटने जागतिक ग्राहक फ्रँचायझी विकसित केली आहे. याचा पुरावा म्हणजे या ब्रॅण्डचा तांदूळ ९०हून अधिक देशात निर्यात केला जातो आणि दरवर्षी ८ कोटींहून अधिक पॅकेट्सची विक्री होते. इंडिया गेट बासमती तांदळाचे दाणे आवश्यक तेवढे जुने असतात, त्यामुळे ते अधिक लांब, हलके, मोकळे (चिकट नसलेले) असतात आणि त्यांना सुंदर वास असतो. त्यामुळे अन्य तांदळांहून ते वेगळे लक्षात येतात.

केआरबीएल लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल कुमार मित्तल याबद्दल म्हणाले, शतकभराहून अधिक काळापासूनचा उद्योगक्षेत्राचा समृद्ध अनुभव गाठीशी असल्यामुळे केआरबीएल लिमिटेडने बासमती तांदळाच्या उद्योगात जगात आघाडीचे स्थान पटकावले आहे. ग्राहकांना सर्वोत्तम दर्जा देऊ करण्याचे विनाशर्त वचन आम्ही अगदी सुरुवातीपासूनच पाळत आलो आहोत.

आज आमचा फ्लॅगशिप ब्रॅण्ड इंडिया गेट बासमतीचे अव्वल दर्जासाठी जगभर कौतुक होत आहे. अलीकडेच झालेल्या एका अभ्यासामध्ये इंडिया गेट बासमती राइसला जगातील १ल्या क्रमांकाचा बासमती तांदूळ ब्रॅण्ड म्हणून मान्यता मिळाली आहे आणि जगभरातील ग्राहकांच्या ताटांमध्ये सर्वोत्तम दर्जाचा बासमती पोहोचवण्याच्या आमच्या अढळ वचनाला मिळालेली ही पावती आहे.

भारतात प्रामुख्याने अनब्रॅण्डेड असलेल्या सुट्या तांदळाच्या बाजारपेठेचे रूपांतर ब्रॅण्डेडमध्ये करणे हे मोठे काम आहे. त्याबद्दल श्री. मित्तल सांगतात, अनब्रॅण्डेड तांदळाला ब्रॅण्डेड करण्यासाठी आवश्यक रूपांतरणाला चालना देण्याचे काम इंडिया गेटने स्वत:कडे घेतले आहे. इंडिया गेट बासमती राइस श्रेणीतील उत्पादने सर्व आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर तसेच ऑफलाइन आधुनिक व्यापारी दुकाने तसेच सामान्य व्यापारी दुकानांमध्ये उपलब्ध आहेत.

केआरबीएल विषयी

केआरबीएल ही बासमती तांदळाचा जगातील सर्वांत मोठी आणि एकमेव एकात्मिक उत्पादक व निर्यातदार कंपनी आहे. कंपनीला युरोफिन्सद्वारे दिले जाणारे एफएसएससी २२००० प्रमाणन आहे. हे जागतिक मान्यता असलेले प्रमाणन आहे. कंपनीची अन्न सुरक्षितता व्यवस्थापन प्रणाली आवश्यकतांचे पालन करणारी आहे याची पुष्टी हे प्रमाणन करते. कंपनी आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता यशस्वीरित्या करत आहे, हे यातून दिसून येते. याशिवाय उत्पादनाचा अव्वल दर्जा व सुरक्षितता यांची खात्रीही हे प्रमाणन करते.

केआरबीएलचे दोन अत्याधुनिक उत्पादन कारखाने आहेत आणि भारतभरातील चार मोक्याच्या ठिकाणी प्रगत पॅकिंग युनिट्सही आहेत. ५००हून अधिक वितरकांचे विस्तृत जाळे आणि ७५०हून अधिक शहरांमध्ये सक्रिय ३ लाखांहून अधिक रिटेल दुकाने यांच्या माध्यमातून केआरबीएल आपली उत्पादने देशभरात पोहोचवू शकत आहे.

केआरबीएल लिमिटेड ही भारतातील पहिली, एकात्मिक तांदूळ कंपनी असून, त्यांच्या पुरवठा साखळीची व्याप्ती विसतृत आहे, तसेच कंपनीला १३० वर्षांचा दीर्घ इतिहास आहे. १९५ मेट्रिक टन/प्रतितास एवढी कंपनीची प्रक्रिया क्षमता आहे. केआरबीएल लिमिटेडच्या पोर्टफोलिओमध्ये तांदळाच्या १४ ब्रॅण्ड्सचा समावेश होतो. त्याचप्रमाणे किनोआ, चिया सीड्स, जवस व ब्राउस राइस यांसारखी आरोग्यकारक उत्पादनेही कंपनी उपलब्ध करून देते. कंपनी इंडिया गेट, युनिटी, नूरजहाँ आणि अशा अनेक ब्रॅण्ड्सखाली तांदळाच्या वैविध्यपूर्ण प्रकारांची विक्री करते. इंडिया गेट या कंपनीच्या फ्लॅगशिप ब्रॅण्डची अव्वल दर्जासाठी जगभरात प्रशंसा केली जाते.

कंपनी बियाणांचे उत्पादन, टच कल्टिव्हेशन (शेतीचा एक आधुनिक प्रकार), तांदळाची खरेदी, साठवण, प्रक्रिया, पॅकेजिंग, बासमती तांदळाचे ब्रॅण्डिंग व मार्केटिंग यांसारखी अनेक कामे करते. ९० हून अधिक देशांतर्गत व तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपीय संघ, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवैत व कतार अशा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कंपनीचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT