India approves its first dengue vaccine ‘Qdenga’, offering hope for protection against all four dengue virus types. saam tv
लाईफस्टाईल

भारतात डेंग्यूच्या पहिल्या लशीला मंजुरी, डेंग्यूपासून लवकरच सुटका होणार

Dengue Vaccine Gets Green Signal in India: डेंग्यू रुग्णांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आलीये... भारतात लवकरच डेंग्यूवरील पहिली लस उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात भारतीय कंपनीनं जपानच्या कंपनीसोबत करार केलाय. त्यामुळे पुढील काळात डेंग्यूपासून सुटका होण्याची शक्यता आहे. पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूमुळे हजारो नागरिक आजारी पडतात. मात्र आता डेंग्यूपासून सुटकेचा मार्ग मोकळा होणार आहे. कारण भारतात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआय यांनी देशात पहिल्यांदाच डेंग्यूवरील लशीला मंजुरी दिलीये. ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या 'क्यूडेंगा' (Qdenga) या लसीला बाजारात वापरण्याची परवानगी दिलीये. विशेष म्हणजे, देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच डेंग्यू लस असून डेंग्यूच्या चारही सीरोटाइप्सविरुद्घ ही लस अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

भारतात पहिली डेंग्यू लस

- भारतातील पहिली स्वीकृत डेंग्यू प्रतिबंधात्मक लस

- 'टाकेडा' कंपनीच्या 'क्यूडेन्गा' (QDENGA) लसीला मंजुरी

- 4 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांसाठी लस उपयुक्त

- डेंग्यूच्या पूर्व संसर्गाच्या तपासणीशिवाय लस देता येणार

- जगभरातील 43 देशांमध्ये आधीच मंजुरी

भारतात लसीला मिळालेली मंजुरी 'ताकेडा'च्या जागतिक क्लिनिकल डेव्हलपमेंट प्रोग्रामवर आधारित आहे. याअंतर्गत फेज 1, फेज 2 आणि फेज 3 चे एकूण 19 क्लिनिकल ट्रायल्सही करण्यात आले आहेत. यात 28 हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला. महत्त्वाचे म्हणजे, 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत 'क्यूडेंगा' या लसीचे उत्पादन देशातच केले जाणार आहे...

'क्यूडेंगा' (TAK-003) ही जपानची कंपनी ताकेडाने विकसित केलेली लस आहे. ताकेडाने हैदराबादस्थित नामांकित औषध कंपनी 'बायोलॉजिकल ई' सोबत एक करार केला आहे. त्यामुळे लसीचे उत्पादन भारतात होत असल्यामुळे जलद आणि अखंड पुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे, लसीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी उत्पादन देशातच होणार असल्याने, किंमत सर्वसामान्यांच्या अवाक्यात असण्याची शक्यता आहे.

जगातले तब्बल एक तृतियांश रुग्ण हे भारतात आढळतात. त्यामुळे भारतात डेंग्यूग्रस्तांची संख्या मोठी असते. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचं प्रमाण वाढतं. त्यामुळे देशातील हवामान बदल आणि डासांच्या वाढत्या प्रजननामुळे संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन ही लस डेंग्यूच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT