Mobile Number Saam TV
लाईफस्टाईल

Mobile Number: जरा डोकं चालवा! भारतात मोबाईल नंबर १० अंकीच का आहे?

10 Digit Mobile Number Fact: फक्त १० अंकी क्रमांक असलेला मोबाईल नंबरच भारतात का वापरतात याची माहिती या बातमीतून जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

10 Digit Mobile Number:

आजकालच्या तरुण पिढीला मोबाईल फोनचं व्यसन लागलं आहे. फक्त तरुणच नाही तर अन्य व्यक्ती देखील तासंतास मोबाईल फोन घेऊन बसतात. आता तुम्हीही तासंतास मोबाईल फोन वापरत असाल तर, प्रत्येक फोन नंबर १० अंकीच का असतो याचं उत्तर तुम्हाला माहितीये का? (Latest Marathi News)

भारतात फक्त १० अंकी मोबाईल नंबर चालतो. एखाद्या नव्या व्यक्तीला फोन लावताना आपण दोन वेळा तरी क्रमांक तपासून घेतो. यावेळी काहीजण १० अंक आहेत का? हे तपासून पाहतात. त्यामुळे फक्त १० अंकी क्रमांक असलेला मोबाईल नंबरच भारतात का वापरतात याची माहिती या बातमीतून जाणून घेऊ.

NNP मुळे १० अंकी क्रमांक

भारताची राष्ट्रीय क्रमांक योजना NNP मार्फत भारतात १० अंकी मोबाईल क्रमांक तयार केला जातो. भारतात वाढत चालेली सोकसंख्या लक्षात घेता १० अंकी मोबाईल क्रमांक तयार करण्यात आला आहे. जर फक्त १ अंकी मोबाईल नंबर ठेवला असता तर फक्त ० ते ९ म्हणजेच १० व्यक्तींनाच मोबाईल नंबर मिळाला असता. तसेच जर २ अंकी क्रमांक असता तर १० ते ९९ म्हणजे १०० व्यक्तींना मोबाईल नंबर मिळाला असता. जनसंख्या लक्षात घेता सध्या १० अंकी मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे.

भारतात लोकसंख्या १३० कोटीच्या आसपास आहे. अशात सर्वांना मोबाईल क्रमांक देता यावेत यासाठी १० अंकी नबंर वापरले जातायत. यातून १ हजार कोटी संपर्क क्रमांत तयार होऊ शकतात. भविष्यात लोकसंख्या आनखीन वाढल्यास १० अंकी नंबरमध्ये वाढ होऊ शकते.

९ अंकी क्रमांक

साल २००३ पर्यंत देशात फक्त ९ अंकी मोबाईल क्रमांक होते. नंतर ते १० अंकी करण्यात आले. तसेच १५ जानेवारी २०२३ पासून विशेष बदल करण्यात आला. यामध्ये लँडलाइनमार्फत कॉल करताना क्रमांकाआधी शून्य लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tractor Morcha : कर्जमाफीसाठी नागपूरात 'ट्रॅक्टर मोर्चा'; शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक, VIDEO

Fact Check : मुलांना जन्म देणारी फॅक्टरी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Navpancham Rajyog 2025: 30 वर्षांनंतर शनी-बुध बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Shocking: AI द्वारे बनवला बहीण-भावाचा अश्लिल व्हिडीओ, नंतर केलं ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

Shocking: मी जगू शकत नाही...; बायको प्रियकरासोबत पळून गेली, वकिलाने संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT