Siddhi Hande
सायली संजीव ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.ती सध्या चित्रपटांमध्ये काम करत आहे.
सायली संजीवला खरी ओळख काहे दिया परदेस या मालिकेतून मिळाली. या मालिकेत तिने गौरी पात्र साकारले होते.
सायली संजीव ही मूळची नाशिकची आहे. तिचे नाशिकमध्ये घर आहे. अभिनेत्री अनेकदा आपल्या नाशिकच्या घरी जाते.
सायली संजीवने शालेय शिक्षण आरजेसी हाय स्कूल धुळे येथून घेतले.तिचा जन्मदेखील धुळ्याचा आहे.
यानंतर तिने नाशिकच्या एचपीसी आर्ट्स अँड आरवायके सायन्स कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्समध्ये बीए केले.
सायलीने त्यानंतर पॉलिटिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. सायलीला कॉलेजमध्ये असतानाच अभिनयाची आवड होती. तिने कॉलेजमध्येही अनेक कार्यक्रमात भाग घेतले होते.
सायली संजीवने अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. सायलीच्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला नॅशनल अवॉर्डदेखील मिळाले आहे.
Next: साडीत बारीक दिसण्यासाठी ब्लाउजची निवड कशी कराल? ५ टिप्स लक्षात घ्या, दिसाल स्लिम-ट्रिम