Nanded Crime News: गरोदर पत्नीसह चार वर्षीय मुलीची झोपेतच हत्या; सैन्यदलात कार्यरत पतीचे कृत्य, आरोपी पती स्वतःच गेला पोलिसात

Nanded News : गरोदर पत्नीसह चार वर्षीय मुलीची झोपेतच हत्या; सैन्यदलात कार्यरत पतीचे कृत्य, आरोपी पती स्वतःच गेला पोलिसात
Nanded Crime News
Nanded Crime NewsSaam tv

संजय सूर्यवंशी

नांदेड : सैन्यदलात कार्यरत पतीने आठ महिन्याची गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना (Nanded) नांदेड जिल्ह्यात घडली. गाढ झोपेत असलेल्या पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस (Police) स्टेशनमध्ये हजर झाला. कंधार तालुक्यातील बोरी येथे हे हत्याकांड घडले. (Tajya Batmya)

Nanded Crime News
Beed News : झोपेतून उठताच दिसले भयानक दृश्य; अनेक ठिकाणी हळदी..कुंकू..लिंबू टाकून पूजा, गावात भीती

बोरी (नांदेड) येथील कार्यरत एकनाथ जायभाये हा सैन्यदलात कार्यरत असून सध्या राजस्थानमधील बिकानेरमध्ये नियुक्त आहे. दरम्यान सुटीवर आला असताना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पत्नी आणि चार वर्षाची मुलगी सरस्वती दोघे झोपेत असताना त्यांचा गळा आवळून (Crime News) हत्या केली. पत्नी भाग्यश्री ही आठ महिन्यांची गरोदर होती. हत्येनंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वतः माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीने माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती.

Nanded Crime News
Sangram Jagtap News: आता आम्हालाही वेगळी भूमिका घ्यावी लागेल; मराठा आरक्षणावर आमदार संग्राम जगताप यांचा इशारा

माहेरून प्लॉटसाठी पैसे आणण्याचा तगादा 

दरम्यान पहिली मुलगी का झाली आणि माहेरून प्लॉटसाठी पैसे घेऊन ये; असे म्हणत पतीने पत्नीची आणि मुलीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या झाल्याने माळाकोळी परिसरात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com