Independence Day 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Independence Day 2024 : 15 ऑगस्टला आकाशात पतंग का उडवली जाते? काय आहे या मागचा इतिहास आणि रंजक स्टोरी

Independence Day 2024: तुम्हीही १५ ऑगस्टला पतंग उडवत असाल तर तुम्हाला या मागची स्टोरी किंवा याचा इतिहास माहिती आहे आहे का?

Ruchika Jadhav

15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन जवळ येताच आकाशात सर्वत्र अनेक व्यक्ती पतंग उडवताना दिसतात. या दिवशी प्रत्येक घरात इमारतींवर उंच उंच हवेत झेप घेणाऱ्या पतंग उडत असतात. काही व्यक्ती पतंग उडवताना स्पर्धा सुद्धा करतात. स्पर्धेमध्ये त्यांना एकमेकांना हारवायचे असते. सकाळी झेंडा वंदन झाल्यावर या स्पर्धांना सुरुवात होते.

आकाशात पतंग उडवण्याची मजा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण लूटत असतात. तु्म्हाला सुद्धा ही पद्धत आवडत असेल आणि तुम्हीही १५ ऑगस्टला पतंग उडवत असाल तर तुम्हाला या मागची स्टोरी किंवा याचा इतिहास माहिती आहे आहे का? आपल्याला आपल्या इतिहासातील प्रत्येक गोष्टी माहिती पाहिजेत. त्यामुळेच आज आम्ही पतंग आणि १५ ऑगस्ट यांचं काय नातं आहे याचीच माहिती तुमच्यासाठी शोधून आणली आहे.

सध्या पतंग उडवताना आपण आझाद आहोत आणि मुक्तपणे हवे तेथे जाऊ येऊ शकतो तसेच आपले जीवन जगू शकतो अशा भावना मनात असतात. मात्र स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जेव्हा व्यक्ती पतंग उडवत होते तेव्हा त्यांच्या मनात वेगळी भावना होती. त्या काळात साइमन कमिशन विरुद्ध भारतीय नागरिक पतंग उडवत होते. सुरु असलेल्या आंदोलनाला आणखी दिशा देण्यासाठी आक्रोश व्यक्त करत पतंग उडवल्या जात होत्या. तसेच त्यावेळी म्हणजे १९२८ मध्ये काळ्या पतंगा उडवण्यात आल्या होत्या.

असे झाले स्वातंत्र्याचे प्रतिक

स्वातंत्र्यानंतर देशात पतंग उडवण्याची परंपरा तशीच कायम राहिली. नागरिकांनी आपण स्वातंत्र्य झालो आता आपण मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतो या आनंदात पतंग उडवण्यास सुरुवात केली. आनंदाने उत्साहाने भारतीय नागरिकांनी विजय साजरा करत पतंग उडवल्या होत्या. यंदा आपण ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. अद्यापही नागरिक स्वातंत्र्याचा हा आनंद साजरा करताना पतंग उडवत आहेत.

काळजी घ्या

आनंदाने प्रत्येक व्यक्ती १५ ऑगस्टला पतंग उडवतात. मात्र यामुळे होणाऱ्या दुर्घटना सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीने धाग्यांचा वापर करत पतंग उडवले पाहिजेत. तसेच आनंद साजरा करताना स्वत:ची आणि आपल्या आसपासच्या सर्व व्यक्ती तसेच आकाशात उडणाऱ्या पक्षांची देखील काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT