Blood test to detect PCOS saam tv
लाईफस्टाईल

महिलांमध्ये वाढणारी PCOS समस्या, मुलं न होण्याचा धोका; ब्लड टेस्टच्या मदतीनं समजू शकतं का?

Blood test to detect PCOS: PCOS ही समस्या आजकाल बऱ्याच प्रमाणात महिलांना सातवते. मात्र या समस्येचं निदान ब्लड टेस्टच्या सहाय्याने होऊ शकतं का?

Surabhi Jayashree Jagdish

कोणत्याही समस्येची आपल्याला लक्षणं जाणवली की आपण त्यासंबंधीची टेस्ट करतो आणि निदान करतो. सप्टेंबर हा महिना पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS च्या जनजागृतीसाठी मानला जातो. मात्र या समस्येचं निदान कसं करायचं हा प्रश्न महिलांच्या समोर असतो. पीसीओएसमुळे महिलांना इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

न्यूबर्ग लॅबोरेटरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी सांगितलं की, वेळीच पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचं निदान झालं तर पुढे येणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात. अशावेळी पाच पद्धतीच्या ब्लड टेस्ट पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचं निदान आणि नियंत्रण करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

एंड्रोजनची पातळी

ॲन्ड्रोजन हार्मोन्स यांचा पुरुष हार्मोन्स देखील म्हटलं जातं. रक्तातील एंड्रोजनची पातळी मोजण्याने महिलांच्या शरीरात हार्मोनल असंतुलन आहे की नाही हे शोधण्यात मदत होते. ज्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणं, शरीरावर जास्त केस वाढणं आणि अनियमित मासिक पाळी यांसारखी लक्षणं दिसून येतात.

इन्सुलिन रेसिस्टंट

इंसुलिन रेसिस्टंट होणं हे PCOS चं एक सामान्य लक्षणं आहे. इन्सुलिन पातळी आणि glucose tolerance मूल्यांकन करणाऱ्या ब्लड टेस्ट या शरीर इंसुलिनला कसा प्रतिसाद देतंय याची माहिती देतात. त्यामुळे या टेस्टच्या माध्यमातून महिलांना PCOS चा त्रास आहे की नाही हे समजू शकतं.

PCOS चं निदान झालं तर, पुढील आरोग्यविषयक समस्या टाळता येणं शक्य आहे. पाच प्रकारच्या रक्त चाचण्या निदान आणि ते नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
डॉ. अजय शाह, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग लॅबोरेटरी

ल्यूटिनाइझिंग हार्मोन

एलएच एक असं हार्मोन आहे ज्याचा संबंध एग्ज रिलीज होण्याशी असतो. PCOSच्या स्थितीमध्ये हे हार्मोन सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात आढळून येतं. यामध्ये अंडाशय योग्य पद्धतीने विकसीत होत नाही त्यामुळे ओव्यूलेशन होत नाही.

सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोब्युलिन (SHBG)

SHBG हे एक प्रोटीन असून ते सेक्स हार्मोन्सना एकत्रित करण्यास मदत करते. SHBG ची कमी पातळी ही PCOS मध्ये वाढलेल्या एंड्रोजन पातळीशी संबंधित असते. SHBG पातळी मोजणं हे हार्मोनल प्रोफाइल समजून घेण्यासाठी फायदेशीर असतं. ज्यामुळे पुढील उपचार कसे करावेत याची माहिती मिळण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: खुशखबर! रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; २५६९ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Lapandav Video : सखीची खरी आई कोण? 'लपंडाव' मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांना बसला धक्का

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

SCROLL FOR NEXT