Cholesterol Side Effects
Cholesterol Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Cholesterol Side Effects : वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकते दूरदृष्टी कमकुवत, चूकनही 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका !

कोमल दामुद्रे

Cholesterol Effects On Eyes : वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, एक चांगल्या अनेक वाईट कोलेस्ट्रॉल आढळतात.

रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊन अडचणी निर्माण होऊन हृदयविकाराचा धोका वाढवून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. नैसर्गिकरित्या शरीरात निर्माण होणारे कोलेस्ट्रॉल हे धोकादायक नसते, परंतु त्याचे प्रमाण जास्त वाढल्याने अनेक रोगांचा धोका वाढण्याची शक्यता असते.

आहारातील साखर आणि सॅच्युरेटेड फॅटयुक्त पदार्थ शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. जेव्हा कोलेस्ट्रॉलचे लेवल वाढते तेव्हा डोळ्यांवरही वाईट परिणाम होतो. डोळ्यांचा रंग बदलणे, पुसट दिसणे,डोळ्यां भोवती काही बदल होतात इत्यादी डोळ्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला डोळे निरोगी ठेवायचे असेल तर डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

डोळ्यांवर उच्च कोलेस्ट्रॉलचा परिणाम कसा होतो?

1. झेंथेलास्मा (Xanthelasma)

झेंथेलास्मा डोळ्यांच्या या समस्येत, डोळ्यांवर (Eye) कोलेस्ट्रॉल जमा होते असे म्हणतात. हे कोलेस्ट्रॉल पापण्यांच्या खालच्या आणि वरच्या बाजूला जमा होऊ शकते. डोळे आणि नाकाच्या आजूबाजूची त्वचा पिवळी पडू लागते परंतु याचा दृष्टीवर परिणाम होत नाही. ज्यांना मधुमेह (Diabetes) आहे, हाय ब्लड प्रेशर (Blood Pressure), धूम्रपान करण्याची सवय आणि लठ्ठपणा यांना त्या समस्यांचा अधिक त्रास होतो.

Eye side effects

2. ऑकर्स सेनीलियस

ऑकर्स सेनीलियस किंवा कॉर्नियल ऑकर्स यामध्ये तुमच्या डोळ्याच्या कॉर्नियाच्या आजूबाजूला निळा आणि राखाडी रंगाची रिंग विकसित होतात. या मागचे कारण म्हणजे कॉर्नियामध्ये कोलेस्ट्रॉल जमा झालेले आहे. हे जमा झालेले कोलेस्ट्रॉल शस्त्रक्रियाच्या मदतीने काढून त्यावर उपचार करता येते. या समस्या मध्यमवयाच्या लोकांमध्ये दिसून येतात.

3. रेटीनल वेन ऑक्लूजन

हा आजार थेट कोलेस्ट्रॉलचे संबंधित आहे. काचबिंदू, रक्तवाहिन्यान संबंधित रोग, हाय ब्लड प्रेशर ,मधुमेह या आजारामुळे रेटीनामध्ये रक्त वाहून नेणाऱ्या रक्तपेशीत अडथळा निर्माण होऊन त्या ब्लॉक होतात. डोळ्याच्या मागील बाजू स्थित असलेला डोळ्यातील पडदा हा एक संवेदनशील ऊतक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyach Bharit: झणझणीत! अस्सल गावरान वांग्याचं भरीत, खास रेसिपी

Oil Free Diabetes Thali : रक्तातील साखर १०० टक्के वाढणार नाही; घरीच बनवा ऑइल फ्री डायबिटीज थाळी

Jalgaon Accident : दुचाकी कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

DCW Employees Fired: दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचारी बडतर्फ.. उपराज्यपालांची मोठी कारवाई; कारण काय?

Ajit Pawar: तुमच्या घरी ४० वर्षे राहिली, तरी तिला बाहेरची समजाल का? सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत अजित पवारांचा सवाल

SCROLL FOR NEXT