Eye care tips, Healthy food for eyes ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात या पदार्थाचा समावेश करा

डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात या पदार्थाचा समावेश करा.

कोमल दामुद्रे

मुंबई : सध्याच्या जीवनशैलीत मोबाईल, लॅपटॉप व यांसारखी उपकरणे आपण दररोज हाताळत असतो. सतत या उपकरणांचा वापर केल्याने आपल्या डोळ्यांना त्रास होऊ लागतो.

हे देखील पहा -

सतत फोनचा वापर केल्याने डोळ्यांची आग होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होण्याच्या समस्या जास्त वाढतात. त्यामुळे आपण डोळ्यांची सतत काळजी घ्यायला हवी. जर आपल्याला चश्मा असेल तर त्याचा वापर आपण करायला हवा. तसेच आपण दिवसभर लॅपटॉपवक काम करत असू तर आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलायला हव्या. आपल्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया. (Healthy food for eyes)

१. लहान मुले व किशोरवयीन, तरुण आणि प्रौढांना पालेभाज्या खाणे आवडत नाही, परंतु, ते डोळ्यांसाठी खूप आरोग्यदायी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. डोळ्यांसह शरीरातील अनेक अवयवांना त्यांचा फायदा होतो. हिरव्या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो. तसेच मॅक्युलर डिजेनेरेशन देखील कमी करता येतात.

२. आपल्याला आहारात अंडीचा समावेश केल्यास त्याचा देखील फायदा होतो. अंड्यातील पिवळ्या बलकांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे आपल्याला डोळ्यांना त्याचा फायदा होतो. पुरेशा प्रमाणात डोळ्यांना प्रथिने मिळाल्यास डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते.

३. बदाम खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. बदामामध्ये जीवनसत्त्व (Vitamins) ई आढळून येते. ज्याचा वापर डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी केले जाऊ शकते.

४. टोमॅटोत ल्युटीन, लाइकोपीन नावाचे घटक असल्यामुळे त्याचा आहारात समावेश केल्यास दूरदृष्टी वाढवण्यास त्याचा फायदा होतो. यात अँटिऑक्सिडंट्स पुरेसे प्रमाणात असल्यामुळे डोळे (Eye) निरोगी राहतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT