आपण आपल्या शरीराची काळजी घेत असतो. परंतु मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. ज्याचा परिणाम आपल्या संपूर्ण जीवनावर होतो. यासाठी शारिरीक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याची देखील योग्यरित्या काळजी घेणे गरजेचे आहे. आपण जे आहार खातो त्याचा प्रभाव आपल्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर पडतो. त्यामुळे आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. यामध्ये पोषक तत्वांचे असणे गरजेचे आहे, पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने मानसिक आरोग्यात सुधार होण्यास मदत होते. जाणून घ्या कोणते पदार्थ मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
फळभाज्या आणि पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कार्बोहायड्रेटस आणि व्हिटॅमिन असतात. त्यातच कांदा, टमाटर, पालक, ब्रोकली आणि बीट सारख्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सिडंटस असतात. त्यामुळे या भाज्यांचा जास्तीत जास्त आहारात समावेश करावा. यामुळे शरीर आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते.
सफरचंद, संत्री, अननस आणि मोसंबी सारखे फळ व्हिटॅमिन सी आणि अॅंटीऑक्सिडंटसने भरपूर असतात. ही फळे त्वचा साफ करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेसाठी फायदेशीर असतात तसेच या फळांमध्ये प्रुक्टोज म्हणजेच फळांमध्ये असलेले नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असतात त्यामुळे शरीराला कार्य करण्यासाठी उर्जा मिळते.
दररोजच्या आहारात शरीराला पुरेसे प्रोटीन न मिळाल्यास त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. म्हणून शरीराला आवश्यक प्रोटीन मिळणे गरजेचे आहेत. त्यातच सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी-जास्त असते. चिकन, अंडी, दही रावस मासा आणि सार्डिन मासा या सारख्या गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे.यामध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रोटीन असतात. यामुळे अनेक समस्या दूर होतात.
ड्रायफ्रुट्स हे आरोग्यासाठी चांगले असतात. त्यातच बादाम आणि अक्रोड हे मेंदूसाठी अधिक फायदेशीर असतात. तसेच जवसाचे बिया, सूर्यफूलाच्या बिया आणि भोपळाच्या बिया यामध्ये भरपूर प्रमाणात मेंदूसाठी पोषक तत्वे असतात.
दालचिनी, हळद, रोजमेरी सारखे औषधी वनस्पती मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव तणावापासून वाचवतात. यामध्ये अॅंटीइनफ्लेमेन्टरी गुणधर्म असतात. त्यामुळे यांचा सेवन करणे फायदेशीर ठरते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Edited by: Priyanka Mundinkeri