BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP MLA Sanjay Upadhyay: बोरिवली येथील भाजप आमदार संजय उपाध्याय यांना एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळालीय. एकाबाजुला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी वातावरण तापलंय. त्याचवेळी आमदाराला धमकी आल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.
BJP MLA Sanjay Upadhyay
BJP MLA Sanjay Upadhyay receives a death threat letter, triggering political unrest in Maharashtra.Saam tv
Published On
Summary
  • भाजप आमदार संजय उपाध्याय यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

  • धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

  • पोलिसांनी तपास सुरू करत धमकी देणाऱ्याचा शोध सुरू

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण तापलंय. आरोप-प्रत्यारोपानंतर आता नेत्यांवर हल्ल्यांच्या घटना घडू लागल्या आहेत. बोरिवलीमधील भाजप आमदार संजय उपाध्याय यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. एका पत्राद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय.

या घटनेनंतर आमदार उपाध्ये यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. धमकीचे पत्र मिळताच त्यांच्या कार्यालयाबाहेर व आसपासच्या परिसरात पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलीय. संबंधित पत्र कोणी तयार केले, त्याचा उद्देश काय आणि आठही संशयितांची भूमिका काय याचा तपास पोलीस वेगाने करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिम परिसरातील फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांना सतत धमक्या मिळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

BJP MLA Sanjay Upadhyay
Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

आमदार उपाध्ये यांच्या कार्यालयात पोस्टमनने पत्र दिलं होतं. त्यांनी ते पत्र कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याकडे दिलं. त्यांनी पत्र वाचलं त्यानंतर आमदारांना ते पत्र व्हॉट्सअपवरून पाठवलं. पत्रात आठ जणांची नावे घेण्यात आली आहेत. हे आठजण आमदार उपाध्ये यांना मारण्याचा कट आखत असल्याचं सांगितलं.

BJP MLA Sanjay Upadhyay
Mahayuti Clash: राणेंविरुद्ध चव्हाण संघर्ष शिगेला! महायुतीत वादाचा भडका, स्पेशल रिपोर्ट

मला सतर्क करण्यासाठी पत्र पाठवण्यात आलंय. पत्र मिळाल्यानंतर मी हे पत्र पोलिसांकडे पाठवलंय. दरम्यान ही गोष्ट नवीन नाहीये. तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळालीय. मी फेरीवाल्यांविरोधात जो लढा मी उभा केलाय. त्यावरून अनेकजण मला धमकी देत घाबवरण्याचा प्रयत्न करत आहेत. मागे बजेट अधिवेशन चालू असताना आपल्यावर हल्ला झाला होता. एका इमारती जवळ पत्रकारांशी संवाद साधताना एका व्यक्तीनं धमकी दिली होती. 'ये जल्दी जानेवाला है, इसका इंटरव्ह्यू क्यो ले रहे है, इसका मर्डर होगा' असं त्या व्यतीनं पत्रकारांना सांगितलं होतं. त्याचीही नोंद पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे असं आमदार उपाध्ये यांनी धमकीचं पत्र आल्यानंतर सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com