diet for weight loss, Weight loss tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

वजन कमी करण्यासाठी भाताऐवजी या पदार्थांचा आहारात समावेश करा

पुलावपासून बिर्याणीपर्यंत भाताच्या अनेक प्रकारांची चव आपण चाखली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पुलावपासून बिर्याणीपर्यंत भाताच्या अनेक प्रकारांची चव आपण चाखली आहे. भात बनवण्यासाठी आपण तांदळापासून त्यात पडणाऱ्या प्रत्येक पदार्थांची आपण व्यवस्थितरित्या पाहाणी करत असतो.

हे देखील पहा -

साधा भात, मसाले भात, जिरा राईस, कढी भात, राजमा भात असे भाताचे विविध प्रकार आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. वजन कमी करणाऱ्यांना बऱ्याचदा भात न खाण्याचा सल्ला दिला जातो परंतु, भात खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो व त्यामुळे शरीरात होणारा अग्नीदाह कमी होतो. भात खाण्याची आवड आहे परंतु, ते खाता येत नाही अशावेळी आपण या काही पदार्थांचा आहारात समावेश करुन भाताची चव चाखून आपले वजन कमी करु शकतो.

१. क्विनोआ राईस (Rice) हा भात न खाणाऱ्यासाठी उत्तम पर्याय आहे. यातून शरीराला आवश्यक ते घटक मिळतात. तसेच यात अमीनो ऍसिड आहे जे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहे. यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम आणि फायबर देखील आढळते. याव्यतिरिक्त, क्विनोआ पूर्णपणे ग्लूटेन-मुक्त आहे.

२. नाचणी अनेक सात्विक गुणधर्म आहेत ज्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. नाचणी हे प्रथिनांचा समृध्द असा स्त्रोत आहे. त्यात दाहक-विरोधी फायटोन्यूट्रिएंट्स देखील असतात जे ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यास मदत करतात.

३. बार्ली हा पांढऱ्या तांदळाचा आणखी एक प्रकार आरोग्यदायी प्रकार आहे. तांदळाच्या तुलनेत बार्लीमध्ये नियासिन, सेलेनियम, लोह, जस्त, प्रथिने आणि फायबर यांसारखे पोषक तत्व जास्त प्रमाणात आहे. याव्यतिरिक्त, बार्लीमध्ये पोटॅशियम, फोलेट, लोह आणि व्हिटॅमिन (Vitamins) बी ६ सारखे घटक असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करते.

४. दलिया हा पदार्थ प्रत्येक घरात आढळून येतो. भाताऐवजी हा पदार्थ उत्तम पर्याय ठरू शकतो. हे सहसा खिचडी, उपमा किंवा दलियाच्या स्वरूपात खाल्ले जाते. यात अनेक कॅलरीज, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फोलेट, लोह, व्हिटॅमिन बी ६ आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT