मुलांना अंगठा चोखण्याची सवय आहे तर या टिप्स फॉलो करा

बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या प्रत्येक गोष्टीच कौतुक पालक करत असतात.
Parenting tips, Child care tips, Thumb sucking
Parenting tips, Child care tips, Thumb suckingब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या प्रत्येक गोष्टीच कौतुक पालक करत असतात. मग ती गोष्ट चांगली असू देत किंवा वाईट याकडे आपण दुर्लक्ष आपण करत असतो.

हे देखील पहा-

काही मुलांना लहानपणापासून अंगठा चोखण्याची सवय लागते. डॉक्टरांच्या मते, ३ वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये अशा गोष्टी असणे साहजिक असते परंतु ही सवय एकदा का मुलांना जडल्यानंतर ती लवकर सुटत नाही. मुलांना ही सवय लागल्यानंतर त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागतो. वाढत्या वयानुसार अंगठा चोखण्याच्या सवयीमुळे मुलांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. या सवयी सोडवायच्या कशा हे आपण जाणून घेऊया.

१. वाढत्या वयानुसार मुले अंगठा चोखत असतील तर त्यांना त्याच्याबद्दल असणाऱ्या वाईट परिणामांची जाणीव करुन द्या. सतत अंगठा चोखल्याने पोटात जंत होऊ शकतात व मुलांना पोट दुखीची समस्या उद्भवू शकते.

२. मुलांना अंगठा चोखण्याची सवय असेल तर ते दिवसातून किती वेळा असे करतात हे पहा. मुलांना ताण आल्यानंतर देखील ते असे करु शकतात यावर लक्ष ठेवा व वेळीच त्यांच्याशी बोलून त्यांना समज द्या.

Parenting tips, Child care tips, Thumb sucking
शरीरातील ऊर्जा नष्ट करणारे हे पदार्थ डाएटमधून आजच बाहेर करा

३. बऱ्याचदा मुलांना भूक लागल्यानंतरही ते अंगठा चोखू लागतात किंवा त्यांचे पोट भरत नसेल तेव्हा देखील ते असे करू शकतात. या सवयीपासून त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांचे पोट भरलेले राहिल असे अन्नपदार्थ त्यांना खाऊ घाला.

४. लहान मुलांचे अंगठे चोखण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगठ्यावर कडू किंवा आंबट पदार्थ लावू शकता ज्यामुळे त्यांच्या आरोग्यास कोणतीही हानी होणार नाही.

५. मुलांना (Child) कंटाळा किंवा ताण आल्यानंतर देखील ते अंगठा चोखू लागतात अशावेळी त्यांना एकटे सोडू नका. तसेच, मुलांना निपल्स किंवा गोड गोळ्या खाण्यासाठी देऊ शकता, ज्यामुळे ते तोंडात अंगठा घालणार नाहीत.

६. मुले रिकामे बसल्यानंतरही त्यांना अंगठा चोखण्याची सवय लागते. त्यांना व्यस्त कसे ठेवता येईल या गोष्टींकडे पालकांनी (Parents) लक्ष द्यायला हवे. तसेच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला देखील आपण घ्यायला हवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com