शरीरातील ऊर्जा नष्ट करणारे हे पदार्थ डाएटमधून आजच बाहेर करा

अन्न हे केवळ पोट भरण्याचे साधन नसून ते आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते.
foods that can drain your energy , Health issue, diet food
foods that can drain your energy , Health issue, diet foodब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आपल्या शरीराला अन्नाची गरज असते. अन्न हे केवळ पोट भरण्याचे साधन नसून ते आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. आपण जे काही पदार्थ खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर थेट होतो.

हे देखील पहा -

काम केल्यानंतर किंवा थकल्यानंतर आपल्या शरीराला ऊर्जेची गरजच असते. दिवसभरात जितकी ऊर्जा वाढते तितकीच ती खर्च देखील होते परंतु, यासाठी आपण झोपेला किंवा तणावाला याचा दोष देतो. साधारणपणे जेवल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते व काम करण्याची आपली इच्छा अजून प्रबळ होत जाते. परंतु ऊर्जा वाढवणारे हे पदार्थ आपल्याला शरीराला किती हानिकारक असू शकतात याची आपल्याला कल्पना नसते. कोणते पदार्थ आहारातून टाळायला हवे हे पाहूया.

१. बाजारात असे अनेक खाद्यपदार्थ मिळतात ज्यात साखरेचा (Sugar) समावेश केला जातो. ज्यामुळे आपले वजन कमी (Weight loss) होते असे आपल्याला वाटत असते परंतु, त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे ऊर्जेचे प्रमाण कमी होते. फ्लेवर्ड दहीपासून पॅक केलेले फळांचे रस, काही एनर्जी बार यामध्ये अधिक साखर असते त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन करणे टाळा.

foods that can drain your energy , Health issue, diet food
झोप पूर्ण न झाल्यास आपण पडू शकतो या व्यसनांना बळी!

२. आपण थकल्यानंतर आपल्याला चहा किंवा कॉफी पिण्याचे सवय असते. कॉफी पिल्याने आपल्या सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन आरोग्यावर शारीरिक व मानसिक परिणाम होतात. कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे आपल्याला काही काळ ऊर्जा मिळून मेंदूची क्रिया वाढते. पण नियमितपणे कॉफी प्यायल्याने झोपेवर विपरीत परिणाम होतात व त्यामुळे शरीरातील ऊर्जाही कमी होते. इतकेच नाही तर पौष्टिकतेच्या बाबतीत आपली समस्या आणखी वाढू शकते.

३. शरीराला डिहायड्रेशन वाटू लागले की, आपण एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतो. यांने आपल्याला काही काळ ऊर्जा मिळते पण शरीरावर यांचा विपरीत परिणाम होतो. यामध्ये जास्त प्रमाणात साखर व कॅफीन असते यामुळे झोपेचा काळ कमी होतो व शरीराला मिळणारी ऊर्जा कमी होते.

४. अनेकदा लोकांना फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ खायला आवडतात. पण हे आरोग्यासाठी अजिबात चांगले मानले जात नाही. वास्तविक, त्यामध्ये फायबर आणि इतर पोषक तत्वे नसतात तर ह्यात चरबीचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे जेव्हा आपण याचे सेवन करतो तेव्हा त्यांचा आपल्या पचनावर नकारात्मक परिणाम होतो. इतकेच नाही तर त्यांच्या सेवनामुळे आपल्या शरीरात ऊर्जा वाढवणारे पोषक घटकही कमी होऊ लागतात, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो आणि शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com