Ganesha and Lakshmi saam tv
लाईफस्टाईल

Diwali 2024: दिवाळीला गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी? घरात येईल सुख-समृद्धी

Diwali 2024: कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवसांत गणपती आणि माता लक्ष्मीची पुजा करण्यात येते.

Surabhi Jagdish

हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणाला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व देण्यात येतं. कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. प्रभू रामचंद्र अयोध्येत परतल्याबद्दल दिवाळीचा सण साजरा केला जातो.

दिवाळीच्या दिवसांत गणपती आणि माता लक्ष्मीची पुजा करण्यात येते. या दिवशी गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते. तुमच्या जीवनात आनंद येऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करते, असं मानलं जातं.

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि-गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी?

दिवाळीत लक्ष्मी-गणेशाची नवी मूर्ती घरी आणण्याची परंपरा आहे. अनेक जण यावेळी त्यांच्या घरी लक्ष्मीची मूर्ती आणतात. अशावेळी नेमकी मूर्ती कुठे ठेवावी हा प्रश्न आपल्या मनात असतो.

श्रीगणेशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीची प्रतिष्ठापना करावी, असं मानलं जातं जे चुकीचे आहे. डावीकडील स्थान हे पत्नीचे स्थान आहे परंतु देवी लक्ष्मी हे गणेशाचे मातृस्वरूप आहे, म्हणून त्यांना नेहमी श्रीगणेशाच्या उजव्या बाजूला ठेवावी. दिवाळीच्या पूजेच्या वेळी देवी लक्ष्मी गणपतीच्या उजव्या बाजूला विराजमान असावी. त्याचप्रमाणे श्रीगणेश आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती पूर्व किंवा पश्चिम दिशेला अशा प्रकारे ठेवाव्यात.

दिवाळीत कलश स्थापनाचं महत्त्व

दिवाळीच्या दिवसात अजून एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे कलश स्थापना. दिवाळीला कलश स्थापना करणं शुभ मानलं जातं. याचं कारण म्हणजे कलश हे वरुणदेवाचे रूप मानण्यात येतं. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी कलशाची स्थापना केल्यास पूजेचं फळ अधिक मिळतं असं मानण्यात येतं. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे होणार आमदार? पाहा Exit Poll

Wardha Exit Poll: वर्ध्यात भाजपचे पंकज भोयर तिसऱ्यांदा होणार आमदार? पाहा Exit Poll

Maval Exit Poll Result : बंडखोर की विद्यामान, मावळची जनता कुणाच्या मागे? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ दिवसांत हे काम करा, नाहीतर पेन्शन विसरा

Gautami Patil : गौतमी पाटील,अलका कुबल अन् सई ताम्हणकर स्क्रिनवर एकत्र झळकणार? 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT