Dhanteras 2024: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? शुभ मुहूर्त आताच नोट करून ठेवा

Dhanteras 2024: धनत्रयोदशीचा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत खरेदी आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे. कुटुंबामध्ये समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यात येतं.
Dhanteras Buying gold
Dhanteras Buying goldsaam tv
Published On

येत्या आठवड्यात दिवाळीला सुरुवात होणार असून २ दिवसांनी धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीसह लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते. दरम्यान धनत्रयोदशीचा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत खरेदी आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे. या दिवशी खासकरून सोने, चांदी तसंच गाडी या वस्तूंची खरेदी केली जाते.

या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी भगवान धन्वंतरीसह कुबेर आणि लक्ष्मीजींची पूजा करण्यात येते. कुटुंबामध्ये समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यात येतं. तुम्ही देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुहूर्त कधी आहे, ते पाहूयात

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचा मुहूर्त

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.31 ते 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.32 पर्यंत असणार आहे. धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला 20 तास 1 मिनिटाचा शुभ वेळ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेत कधीही सोन्याची खरेदी करू शकता.

धनत्रयोदशीच्या दिवशी सामान्यपणे सोनं, चांदी, दागिने, कार, घरं यांची खरेदी करण्यात येते. त्याचप्रमाणे झाडू, पितळेची भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील विकत घेतल्या जातात. चांदीची नाणी, गणेश आणि लक्ष्मी मूर्ती खरेदी करणं या काळात अत्यंत शुभ मानलं जातं.

धनत्रयोदशीला खरेदीचं महत्त्व

या वर्षी धनत्रयोदशीला त्रिपुष्कर योग तयार होतोय. या योगात केलेल्या कामाचे तिप्पट फळ मिळू शकणार आहे. असं म्हणतात की, जर तुम्ही कोणतीही शुभ वस्तू खरेदी केली तर ती 3 पटीने वाढू शकते.

त्रिपुष्कर योग - सकाळी ६.३१ - सकाळी १०.३१

धनत्रयोदशीला का खरेदी करतात सोनं?

धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची धातू खरेदी करणं शुभं मानलं जातं. या दिवशी सोनं हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं. धनत्रयोदशीला सोने खरेदी केल्याने घरात आशीर्वाद मिळतात, देवी लक्ष्मी घरात कायमचा वास राहतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com