वास्तुशास्त्रानुसार घरातील स्वयंपाकघराला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नातून घरातील प्रत्येकाला ऊर्जा आणि आरोग्य मिळते अशी मान्यता आहे. स्वयंपाकघराचा संबंध अग्नीशी जोडला जातो. त्यामुळे घरातील गॅस शेगडी म्हणजेच चुलीची जागा योग्य असणं महत्त्वाचं मानले जाते.
अनेक जण घर बांधताना किचन कोणत्या दिशेला असावं याकडे लक्ष देतात. पण स्वयंपाकघरातील ओट्यावर गॅस शेगडी नेमकी कोणत्या दिशेला ठेवावी याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. वास्तुशास्त्रानुसार गॅस शेगडी ठेवण्याची योग्य दिशा कोणती? स्वयंपाक करताना कोणत्या दिशेला तोंड असावं? जाणून घेऊया
Home Vastu Tips
नुसार दक्षिण-पूर्व दिशेला आग्नेय कोन असं म्हटलं जातं. या दिशेचा संबंध अग्नी तत्त्वाशी जोडला जातो. त्यामुळे स्वयंपाकघर आणि गॅस शेगडीसाठी ही दिशा योग्य मानली जाते. घरातील स्वयंपाकघराची रचना अशी असेल की दक्षिण-पूर्व दिशेला गॅस शेगडी ठेवता येऊ शकते तर या ठिकाणी शेगडी ठेवणं शुभ मानलं जातं.
वास्तुशास्त्रात केवळ गॅस शेगडीची जागाच नाही तर स्वयंपाक करताना व्यक्तीचं तोंड कोणत्या दिशेला असावं यालाही महत्त्व दिलं जाते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाक करताना पूर्व दिशेला तोंड असणं चांगलं मानलं जातं. त्यामुळे गॅस शेगडी बसवताना स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचं तोंड पूर्व दिशेला राहील अशा पद्धतीने तिची जागा ठरवण्याचा सल्ला दिला जातो.
स्वयंपाकघरात गॅस शेगडी आणि सिंक या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. वास्तुशास्त्रानुसार, गॅस शेगडीचा संबंध अग्नी तत्त्वाशी तर सिंकचा संबंध जल म्हणजेच पाणी तत्त्वाशी जोडला जातो. अग्नी आणि पाणी ही दोन्ही वेगवेगळी तत्त्वं असल्यामुळे गॅस शेगडी आणि सिंक अगदी जवळ ठेवू नयेत असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर-पूर्व दिशेला ईशान्य कोन म्हणतात. या दिशेचा संबंध पाणी आणि पूजेशी जोडला जातो. त्यामुळे या दिशेला गॅस शेगडी ठेवणं टाळावं असा पारंपरिक वास्तुशास्त्राचा सल्ला आहे. म्हणूनच स्वयंपाकघरात गॅस शेगडीची जागा ठरवताना या दिशेचा विचार करणं महत्त्वाचं मानलं जातं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.