लाईफस्टाईल

Mandir Vastu Tips: तुमच्या घरातील देव्हारा कोणत्या दिशेला आहे? चुकीच्या दिशेला असल्यास वाढू शकतो वास्तूदोष

Vastu tips for home temple: भारतीय वास्तुशास्त्रानुसार, घरातील देवघर किंवा पूजाघराची दिशा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. चुकीच्या दिशेला देवघर ठेवल्यास घरात वास्तु दोष निर्माण होतात आणि मानसिक तसेच आर्थिक अडचणी वाढतात.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्ही राहत असलेल्या वास्तूचा तुमच्या कामावर तसंच आरोग्यावर परिणाम होतो हे तुम्हाला माहितीये का? तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, यासाठी तुम्हाला वास्तू शास्त्राचं पालन करणं गरजेचं आहे. घराच्या प्रत्येक भागात वास्तु तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे. घरातील देव्हारा हे देखील घरात एक महत्त्वाचं स्थान आहे. जर तुम्ही या वास्तु तत्वांचं पालन केलं तर तुम्हाला सकारात्मक मिळू शकतात.

या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

घरातील देव्हारा कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. ते नेहमी थोड्या उंच प्लॅटफॉर्मवर ठेवा. त्याचप्रमाणे तुमच्या देव्हाऱ्यात हवा खेळती राहते का याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे पुरेश्या प्रमाणात प्रकाश असणंही गरजेचं आहे. या नियमांचे पालन केल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

तुमच्या घरातील देव्हारा एका शांत ठिकाणी असला पाहिजे. यामुळे जेव्हा तुम्ही पुजा करत असाल तेव्हा तुमच्या धार्मिक कार्यात कोणाताही अडथळा येणार नाही. वास्तुदोष टाळण्यासाठी तुम्ही देव्हाऱ्यातील स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या देव्हाऱ्याखाली बूट आणि चप्पल ठेवल्याने देखील वास्तुदोष होऊ शकतात.

मूर्ती ठेवण्याचे नियम

वास्तुशास्त्रात असं म्हटलंय की, शनि आणि भगवान शिव यांच्या मूर्ती कधीही देव्हाऱ्यात एकत्र ठेवू नये. तुमच्या घरातील देव्हाऱ्यात काली, राहू, केतू आणि शनि यांच्या मूर्ती देखील ठेू नये. अन्यथा तुम्हाला नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. जर तुमच्या देव्हाऱ्यात शिवलिंग स्थापित असेल तर त्याच्या जवळ खूप जास्त मूर्ती ठेवू नका.

देव्हाऱ्याची योग्य दिशा कोणती?

वास्तू शास्त्रानुसार तुमच्या घरातील देव्हारा हा उत्तर-पूर्वी म्हणजेच इशान्य कोनात असाल पाहिजे. ही दिशा देव्हाऱ्यासाठी अगदी उत्तम मानली जाते. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात.

तुमच्या देव्हाऱ्याजवळ बाथरूम किंवा टॉयलेट येणार नाही याचीही काळजी घ्यावी. असं असल्यास तुम्हाला वास्तूदोषाचा सामना करावा लागू शकतो.

सकारात्मक परिणाम मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात तुळशीचे रोप, गंगाजल आणि कलश ठेवू शकता. यामुळे कुटुंबातील व्यक्तींना परिणाम मिळू शकतात, तसंच तुमच्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी येऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaibasa News : ३६ तासांपासून धुमश्चक्री, जवान तुटून पडले, आतापर्यंत २१ नक्षलवाद्यांचा खात्मा

Kalyan : ६० हजारांचा मोह, तो बुकिंग क्लर्क अन् अलगद जाळ्यात अडकला रेल्वेचा तोतया व्हिजिलन्स इन्स्पेक्टर

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेवर वाद, दूरच्या केंद्रांमुळे उमेदवारांचे आंदोलन

Amazon Layoffs: मोठी बातमी! अ‍ॅमेझॉनमध्ये सर्वात मोठी नोकरकपात, १४,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार

IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूशी हँडशेक, मिठीही मारली...; सामन्यानंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल

SCROLL FOR NEXT