Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Shukraditya Neechbhang Rajyoga: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर आणि त्यांची युती मानवी जीवनात मोठे बदल घडवून आणते. आज, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी, ऐश्वर्य आणि वैभवाचा कारक असलेला शुक्र ग्रह आपली नीच रास असलेल्या कन्या राशीत प्रवेश करत आहे.
Shukra Grah
Shukra Grah Astro Tare
Published On

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा प्रेम, ऐश्वर्य, भौतिक सुख, विलास, सौंदर्य, संपत्ती आणि यांचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्राच्या स्थितीत होणारा बदल 12 राशींमध्ये दिसून येतो. सध्या शुक्र सिंह राशीत विराजमान असून आज तो आपल्या नीच राशी कन्या मध्ये प्रवेश करणार आहे. नीच राशीत आल्यावर शुक्राचा सकारात्मक प्रभाव कमी होतो.

परंतु या वेळी कन्या राशीत आधीच सूर्य ग्रह विराजमान आहे. त्यामुळे सूर्याशी युती करून शुक्रादित्य नीचभंग राजयोग निर्माण होणार आहे. या योगामुळे 12 राशींवर त्याचा काही ना काही परिणाम दिसून येतो. यावेळी तीन राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

Shukra Grah
Malavya Rajyog: १२ महिन्यांनंतर शुक्र बनवणार पॉवरफुल योग; कमाईसोबत 'या' राशींना होणार धनलाभ

कन्या रास (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या लग्न भावात निर्माण होणारा नीचभंग राजयोग अनेक सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. हा काळ अविवाहितांसाठी शुभ ठरणार आहे. नोकरशाहीत काम करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी आर्थिक वाढ आणि लाभदायक व्यवहार घडण्याची शक्यता आहे.

Shukra Grah
Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

धनु रास (Sagittarius Zodiac)

धनु राशीमध्ये तयार होणारा नीचभंग राजयोग विविध क्षेत्रांत शुभ ठरणार आहे. हा योग कर्म भावावर, म्हणजेच दशम भावावर परिणाम करतो. ज्यामुळे काम आणि व्यवसायात उल्लेखनीय प्रगती होण्याची संधी मिळणार आहे. कोणत्याही रचनात्मक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. आपल्या प्रतिभेची आणि रचनात्मकतेची प्रशंसा होणार आहे.

Shukra Grah
Mangal And Guru Yuti: १२ वर्षांनी होणार मंगळ-गुरुचा संयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या आठव्या भावात तयार होणारा नीचभंग राजयोग अनेक चांगले परिणाम देतो. या राशीतील व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. भौतिक सुख आणि आनंदही अनुभवता येणार आहे. गृहस्थांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. घरातील जुने वाद संपतील आणि घरात सुख-शांती राहणार आहे.

Shukra Grah
Lucky Zodiac Signs: 12 तासांनंतर पालटणार 'या' राशींचं नशीब; 50 वर्षांनंतर गुरु- शुक्र बनवणार लाभ-दृष्टी योग

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com