Lucky Zodiac Signs: 12 तासांनंतर पालटणार 'या' राशींचं नशीब; 50 वर्षांनंतर गुरु- शुक्र बनवणार लाभ-दृष्टी योग

Jupiter Venus Conjunction: भारतीय ज्योतिषशास्त्रात (Vedic Astrology) ग्रहांच्या युतीला अत्यंत महत्त्व दिले जाते. जेव्हा दोन शुभ ग्रह एकत्र येतात, तेव्हा तो काळ अनेक राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरतो. आज रात्री (पुढील १२ तासांत) असाच एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून येत आहे.
Lucky Zodiac
Lucky Zodiac Signssaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक कालांतराने आपापल्या कक्षेत भ्रमण करतात. यावेळी त्या ग्रहांचा इतर इतर ग्रहांसोबत विशिष्ट योग तयार होतो. या ग्रह संयोगांचा परिणाम केवळ व्यक्तीच्या जीवनावरच नव्हे तर देश-विदेशातील घडामोडींवरही दिसून येतो. बुधवार ८ ऑक्टोबर रोजी असेच एक अत्यंत शुभ ज्योतिषीय संयोग निर्माण होणार आहे. या दिवशी गुरु आणि शुक्र हे दोन अत्यंत शुभ ग्रह एकमेकांपासून ६० अंशांच्या कोनात स्थित राहतील.

या स्थितीमुळे ‘लाभ दृष्टि योग’ तयार होणार आहे. जो काही राशींसाठी भाग्यवर्धक ठरू शकणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे उत्पन्नात वाढ होण्याची आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. या दृष्टी लाभाचा कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

Lucky Zodiac
Chandra Surya Yuti: चंद्र-सूर्याची युतीने 'या' राशींच्या अडचणी वाढणार; नातं तुटण्यासोबत आर्थिक नुकसानही होणार

धनु रास

धनु राशीच्या व्यक्तींसाठी गुरु आणि शुक्राचा लाभ दृष्टि योग अत्यंत शुभ फलदायी ठरू शकणार आहे. विदेश प्रवासाशी संबंधित कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तसंच बेरोजगारांना नोकरीचे चांगली संधी मिळू शकणार आहे. यावेळी मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत. अडलेली कामं या काळात पूर्ण होणार आहे.

Lucky Zodiac
Budhaditya Rajyog: 17 सप्टेंबरला चमकणार 'या' राशींचं नशीब; 1 वर्षाने होणार बुध-सूर्याची युती

कर्क रास

गुरु आणि शुक्राचा लाभ दृष्टि योग कर्क राशीच्या व्यक्तींनाही सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. या काळात तुम्हाला लहान-मोठ्या प्रवासाच्या संधी मिळू शकतात. सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः अनुकूल ठरणार आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि काही जुन्या प्रकल्पांना पुन्हा गती मिळू शकणार आहे.

Lucky Zodiac
Surya-Budh Yuti: 12 महिन्यांनी चंद्राच्या राशीत होणार सूर्य-बुधाची युती; 'या' राशींना मिळणार अचानक पैसे

वृषभ रास

वृष राशीच्या व्यक्तींना गुरु आणि शुक्राच्या लाभ दृष्टि योगाचा थेट फायदा होऊ शकतो. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात नवा निखार येणार आहे. विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन आनंदी आणि सौहार्दपूर्ण राहणार आहे. बँक बॅलन्समध्ये वाढ होणार आहे. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रांत प्रगतीची चिन्हे दिसणार आहे. अविवाहितांसाठी चांगले विवाहप्रस्ताव येण्याचीही शक्यता आहे.

Lucky Zodiac
Zodiac Signs Today: बुधाचा उच्चस्थानी योग, सूर्य-चंद्राचा संयोग; या ४ राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com