लिवर हा शरीरातील महत्त्वाचा अवयव असून, अयोग्य आहार आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे त्याचे गंभीर नुकसान होत आहे. आज अनेक लोक लवकर वयातच फॅटी लिव्हरसारख्या समस्यांना सामोरे जात आहेत. यामुळे लिवरच्या ऊतींचे नुकसान होऊन त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परिणामी, शरीरात विषारी घटक साचू लागतात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. लिवरचं नुकसान काहीवेळा प्राणघातकही ठरू शकतं.
लिवरचे नुकसान अनेक कारणांनी होऊ शकते, जसे की अतिसारखे मद्यपान, व्हायरल हेपेटायटीस, फॅटी लिव्हरची समस्या किंवा वेदनाशामक औषधांचे अतिसेवन. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की लिवरचे सुरुवातीचे लक्षणे सामान्यतः दुर्लक्षित होतात आणि जेव्हा लक्षात येतात, तेव्हा स्थिती गंभीर झालेली असते. मात्र ही मूक लक्षणे वेळेत ओळखली गेल्यास लिवरच्या मोठ्या आजारांना आणि गुंतागुंतीला टाळता येऊ शकते.
लिवरच्या नुकसानीची लक्षणे व्यक्तीच्या आरोग्य आणि नुकसानाच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. सुरुवातीची लक्षणे सौम्य असल्यामुळे ती सहजपणे दुर्लक्षित केली जातात. लिवरमध्ये सातत्याने होणारी जळजळ त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. पोटदुखी, अन्न न पचणे, सतत बद्धकोष्ठता यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास ती दुर्लक्षित न करता वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे, अन्यथा लिवरचे गंभीर नुकसान होऊ शकते.
सामान्य थकवा वेळोवेळी जाणवणं नैसर्गिक असलं, तरी तो सतत आणि वाढत राहिल्यास तो लिवरच्या समस्येचं लक्षण असू शकतो. लिवर खराब होऊ लागल्यास मेलाटोनिन आणि ग्लुकोज हार्मोनचं संतुलन बिघडतं, ज्यामुळे झोपेच्या समस्याही उद्भवतात. सतत झोप येणं, दिवसभर थकवा वाटणं किंवा नीट झोप न लागणं ही लक्षणं लिवरच्या आरोग्यावर परिणाम करत असल्याचे संकेत असू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.