Quit Chapati Challenge saam tv
लाईफस्टाईल

Quit Chapati: महिनाभर गव्हाची चपाती खाणं सोडलं तर? पाहा तुमच्या शरीरावर कसा होईल परिणाम?

Quit Chapati Challenge: चपाती हा भारतीयांच्या जेवणाच्या ताटातील एक भाग आहे. पण महिनाभर गव्हाची चपाती न खाल्ल्यास काय होईल? चला तर मग उत्तर जाणून घेऊया

Surabhi Jayashree Jagdish

फीट आणि फाइन राहण्यासाठी आपण हेल्थ डाएटवर अधिक भर देतो. संपूर्ण आहारामध्ये आपण डाळ, भात, भाजी, पोळी यांचा समावेश करतो. मात्र अनेकजण वजन कमी करण्यासाठी भात किंवा पोळी यांचा आहारात समावेश करत नाही. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, चपाती खाल्ली नाही तर त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

चपाती हा भारतीयांच्या जेवणाच्या ताटातील एक भाग आहे. ज्याशिवाय अनेक लोकांचे जेवण जवळजवळ अपूर्ण मानलं जातं. रोज गव्हाची चपाती खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात, पण महिनाभर गव्हाची चपाती न खाल्ल्यास काय होईल? चला तर मग उत्तर जाणून घेऊया

ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते

गहू हा शरीरातील ग्लुकोजचा महत्त्वाचा स्रोत आहे. अशात जर आहारातून गहू पूर्णपणे काढून टाकला तर ब्लड शुगर लेवल स्थिर होऊ शकतं. हे विशेषतः मधुमेहींसाठी फायदेशीर मानलं जातं.

पचनक्रिया सुधारते

गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असतं. अशात गव्हाच्या चपातीच्या सेवनामुळे आतड्यांसंबंधी अडथळे निर्माण होऊ लागतात. याशिवाय पचनक्रिया देखील मंदावते. ज्यामुळे गॅस, फुगणे, पोटदुखी, उलट्या आणि क्रॅम्प्स येणं हा त्रास होऊ शकतो.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

कार्बोहायड्रेट्सचा तुमच्या वजनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आहारात गव्हाचा समावेश नसेल तर कॅलरीजचं प्रमाण कमी होतं आणि आपलं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

सीलिएक समस्येचा धोका होतो कमी

गव्हाच्या सेवनाने सेलिआकच्या समस्येचा धोका वाढतो. हा एक स्वयंप्रतिकार रोग असून अनुवांशिकदृष्ट्या हा वाढत जातो. यामुळे लहान आतड्याला नुकसान होण्याचा धोका असको.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT