Skin Cancer SAAM TV
लाईफस्टाईल

Skin Cancer: त्वचेवर ही लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या; स्किन कॅन्सरचे संकेत असू शकतात

Skin cancer: अनेकदा त्वचेवर दिसणाऱ्या बदलांकडे आपण सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतो. मात्र त्वचेतील होणारे बदल हे अनेकदा कॅन्सरची लक्षणं दर्शवतात. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

स्किन कॅन्सर म्हणजेच त्वचेचा कॅन्सर हा जगभरात झपाट्याने वाढणाऱ्या आजारांपैकी एक मानला जातो. भारतातही या कॅन्सरचे रुग्ण सतत वाढताना दिसतायत. तज्ज्ञांच्या मते, हा असा कॅन्सर आहे ज्याची सुरुवातीची लक्षणं त्वचेवर स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे याचं वेळेत निदान झालं तर या स्किन कॅन्सरचे उपचार सोपे आणि बर्‍याच प्रमाणात यशस्वी होऊ शकतात.

त्वचेच्या कॅन्सरची समस्या तेव्हा वाढते ज्यावेळी लोक त्वचेवर दिसणारे सुरुवातीचे बदल दुर्लक्षित करतात. अनेकदा या बदलांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष केलं जातं. त्वचेच्या कॅन्सरची नेमकी लक्षणं काय आहेत ती पाहूयात.

त्वचेच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं

बहुतेक लोकांना आपल्या शरीरावरील तीळ, फिकट डाग किंवा त्वचेवरील ठिपक्यांची माहिती असते. स्किन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं याच ठिपक्यांमध्ये बदल होण्यापासून सुरू होतात. जर त्वचेवर नवीन डाग दिसू लागला किंवा जुना तिळ अचानक रंग, आकार किंवा बदलू लागला तर हे स्किन कॅन्सरचे पहिले लक्षण मानलं जातं.

ABCDE नियमाने ओळख

तज्ज्ञ स्किन कॅन्सर ओळखण्यासाठी ABCDE नियम वापरण्याचा सल्ला देतात-

  • A - Asymmetry (असमानता): तिळाचा एक भाग दुसऱ्या भागाशी जुळत नसेल.

  • B - Border: तिळाच्या कडा अनियमित, धूसर किंवा फाटलेल्या दिसतील.

  • C - Color (रंग): तिळात एकापेक्षा जास्त रंग दिसून येणं

  • D - Diameter : तिळाचा आकार वाढत असेल, विशेषतः 6 मिमीपेक्षा मोठा झाला असेल.

  • E - Evolving (बदल): तीळ सतत बदलत असेल, शिवाय त्याला खाज, वेदना, रक्त येणं किंवा नवीन तिळ तयार होणं अशा समस्या दिसत असतील.

स्किन कॅन्सरची इतर सुरुवातीची लक्षणं

  • त्वचेवर नवीन डाग किंवा जखम दिसणं.

  • तीळाला सतत खाज, वेदना किंवा जळजळ होणं.

  • जखमेवर वारंवार खरूज तयार होणं किंवा रक्त येणे.

  • त्वचेवरील डागाचा आकार सतत वाढणं किंवा आसपासच्या त्वचेवर पसरत जाणं.

  • त्वचेवर मेणासारखा किंवा चमकदार उभार दिसणं.

  • त्वचा लालसर, खडबडीत किंवा स्केली ठिपका तयार होणे.

कोणाला सर्वाधिक धोका?

तज्ज्ञांच्या मते, ज्यांची त्वचा फार गोरी आहे किंवा जे दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहतात त्यांना या कॅन्सरचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबात आधी ही या आजाराची नोंद आहे त्यांनी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

तज्ज्ञ सांगतात की, जर त्वचेवर कोणताही असामान्य बदल दिसला, जखम वेळेत भरली नाही किंवा तीळ अचानक बदलला तर त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: हे बाळ आमच्या मुलाचं नाही..., सासू-सासऱ्यांकडून चारित्र्यावर संशय; सुनेने ९ महिन्यांच्या मुलीला संपवलं

Maharashtra Live News Update: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंटवर टाकला दरोडा

Black Coffee vs Milk Coffee: ब्लॅक कॉफी की मिल्क कॉफी, कोणती अधिक फायदेशीर?

CET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! CET परीक्षा वर्षातून ३ वेळा होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

HBD Badshah : व्यवसाय, रिअल इस्टेट गुंतवणूक अन् बरंच काही; बादशाहा किती कोटींचा मालक?

SCROLL FOR NEXT