Signs you are fit and healthy saam tv
लाईफस्टाईल

Symptoms of good health : शरीरात जर 'ही' लक्षणं दिसली तर समजा तुम्ही फीट आहात; पाहा तुम्ही निरोगी आहात की नाही

Signs you are fit and healthy : आजच्या धावपळीच्या जीवनात आपण निरोगी आहोत की नाही, हे कसं ओळखावं हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. केवळ आजार नसणं म्हणजे आरोग्य नव्हे.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण फीट आणि फाईन राहिलं पाहिजे. आपल्याला कोणतेही आजार नसावेत असं प्रत्येकाला वाटतं. कोणतेही आजार किंवा समस्या असतील तर शरीर तुम्हाला त्याचे संकेत देतं. त्याचप्रमाणे तुम्ही फीट आहात याचेही संकेत शरीर तुम्हाला देतं.

निरोगी असणं म्हणजे केवळ चांगलं वाटणं नाही. तर आपल्या शरीरातून वेळोवेळी सूक्ष्म संकेतही मिळत असतात की सर्व काही व्यवस्थित सुरु आहे. ही लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.

लघवीचा रंग

आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा संकेत म्हणजे लघवीचा रंग. पांढरट किंवा फिकट पिवळा लघवीचा रंग असल्यास की शरीर पूर्णपणे हायड्रेट आहे. याचाच अर्थ तुमची किडनी खूप चांगलं कार्य करतेय. लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर त्या व्यक्तींमध्ये डिहायड्रेशन किंवा अन्य आरोग्यविषयक समस्या असू शकतात.

नियमित शौचास जाणं

दररोज किंवा एक-दोन दिवसांमध्ये एकदा वेळा सहज शौचास जावं लागणं हे पचनक्रियेच्या चांगल्या कार्यक्षमतेचं लक्षण आहे. शौचावेळी कोणताही त्रास होत असणं हे तुमचा आहार संतुलित आहे असल्याचं लक्षण आहे.

मऊ ओठ

ओठांचं आरोग्य आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण आणि पोषणाच्या स्थितीचं संकेत देतं. कोरडे, फाटलेले ओठ हे डिहायड्रेशन किंवा जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचं सांगतात.

महिलांना नियमित मासिक पाळी

स्त्रियांसाठी नियमित मासिक पाळी येणं हे चांगल्या आरोग्याचं एक लक्षण आहे. जर पाळी वेळेवर येते आणि फारशी वेदना देत नसेल तर हार्मोन्स संतुलित आहेत आणि प्रजननसंस्था योग्य प्रकारे कार्य करत हे दर्शवते.

जखमा लवकर भरून येणं

आपल्या शरीरावर जर जखमा, खरचटणं, फोडं या घटना लवकर भरून येत असतील तर ती एक चांगली प्रतिकारशक्ती असल्याचे संकेत आहेत. जखमा लवकर न भरल्यास जीवनसत्त्वांची कमतरता, रक्ताभिसरणातील समस्या किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याचं लक्षण असतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: 12वी फेल, २ वर्षे दूध विकले, मोठ्या जिद्दीने केली UPSC क्रॅक; नाशिकच्या लेकाची यशोगाथा

Asim Munir : ट्रम्पच्या कुबड्यांवर मुनीरच्या बेडूक उड्या;पाकचा हिटलर अमेरिकेत बरळला, VIDEO

Tuesday Horoscope : ५ राशींच्या लोकांवर गणरायाची कृपा होणार; धन, सुख,समृद्धीचा वर्षाव होणार, वाचा मंगळवारचं राशीभविष्य

Manoj Jarange : मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, VIDEO

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT