Symptoms of liver cancer saam tv
लाईफस्टाईल

Symptoms of Liver Cancer: वजन कमी होण्यासोबत हे संकेत दिसेल तर समजा लिव्हर कॅन्सर झालाय, शरीरातील बदल ओळखा

Liver cancer symptoms weight loss: यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, जो विषारी पदार्थ बाहेर काढणे पचनक्रिया आणि प्रोटीन तयार करण्यासारखी अनेक कार्ये करतो. मात्र, यकृताच्या कॅन्सरची लक्षणं सहसा सुरुवातीच्या टप्प्यात पटकन ओळखू येत नाहीत.

Surabhi Jayashree Jagdish

मानवी शरीर हे प्रत्येक आजाराचे संकेत देत असतं. तुम्हाला कोणताही आजार झाला असो तुमचं शरीर तुम्हाला त्याबद्दल नेहमी सांगतं असतं. असंच जर अचानक कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होऊ लागलं आणि त्यासोबत इतर काही लक्षणे दिसू लागली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे शरीरात गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.

एक धोकादायक आजार म्हणजे लिव्हरचा कॅन्सर. लिव्हर कॅन्सर हा जीवघेणा आजार असून त्याची सुरुवातीची लक्षणं साध्या आरोग्याच्या समस्यांसारखी वाटू लागतात. त्यामुळे अनेक लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. ही लक्षणं वेळेत ओळखली गेली तर उपचार शक्य होतात. लिव्हर कॅन्सरचं एक प्रमुख लक्षण म्हणजे कारणाशिवाय वजन कमी होणं. यासोबत आणखी काही लक्षणे दिसतात, जी या आजाराचे संकेत देतात.

कावीळ

कावीळ हा फार त्रासदायक आजार आहे. पण कावीळ लिव्हर कॅन्सरचं स्पष्ट लक्षण मानली जाते. लिव्हर नीट काम करू शकत नाही तेव्हा बिलिरुबिन नावाचं पदार्थ शरीरात साचू लागतो. त्यामुळे त्वचेचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा होतो. गडद रंगाची लघवी आणि फिकट रंगाचे शौच हेही जॉन्डिसची लक्षणं आहेत.

पोटदुखी आणि सूज

लिव्हर पोटाच्या उजव्या वरच्या भागात असतो. या भागात सतत वेदना किंवा अस्वस्थता जाणवली तर ते लिव्हर कॅन्सरचे लक्षण असू शकतं. कॅन्सरमुळे लिव्हरमध्ये सूज येते ज्यामुळे पोट फुगल्यासारखंही वाटू लागतं. ही वेदना अनेकदा कोणत्याही कारणाशिवाय सुरू होते आणि वेळेनुसार वाढतं.

थकवा, अशक्तपणा आणि भूक न लागणं

लिव्हरचं काम शरीराला ऊर्जा निर्माण करून देणं असतं. पण लिव्हरमध्ये कॅन्सर झाल्यास ते नीट काम करू शकत नाही. त्यामुळे शरीरात ऊर्जा कमी होते आणि व्यक्तीला सतत थकवा व अशक्तपणा जाणवतो. याशिवाय, लिव्हर कॅन्सरच्या रुग्णांना भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होतं.

काय केलं पाहिजे

जर अचानक वजन कमी होण्यासोबत ही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासण्या करून घ्या.

  • मद्यपान पूर्णपणं टाळा

  • संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या

  • हिपॅटायटीससारख्या आजारांपासून बचाव करा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT