Signs of high blood sugar saam tv
लाईफस्टाईल

Uncontrolled diabetes symptoms: शरीरात 'हे' बदल दिसले तर समजा डायबेटीज नियंत्रणाबाहेर गेलाय; लक्षणं ओळखून त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या

Signs of high blood sugar: काही वेळा जीवनशैलीतील बदल किंवा निष्काळजीपणामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि मधुमेह नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. जर तुमचा मधुमेह नियंत्रणात नसेल, तर शरीर काही विशिष्ट लक्षणांद्वारे तुम्हाला त्याची जाणीव करून देते.

Surabhi Jayashree Jagdish

  • जास्त साखरेमुळे शरीराच्या अवयवांवर परिणाम होतो.

  • अतिरिक्त तहान लागणे मधुमेहाचे प्रारंभिक लक्षण आहे.

  • वारंवार लघवी होणे रक्तातील साखर जास्त असल्याचे संकेत देते.

रक्तात साखरेची पातळी कायम जास्त राहिली तर ती हळूहळू शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करू लागते. सुरुवातीला या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं पण वेळेत लक्ष दिलं नाही तर ही समस्या हृदयविकार, किडनी निकामी होणं, डोळ्यांचं कमजोर होणं, जखमा न भरून येणं किंवा वारंवार होणाऱ्या इन्फेक्शन रूप घेऊ शकतं.

प्रत्येक आजाराप्रमाणे मधुमेहाची देखील काही लक्षणं दिसून येतात. यावेळी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्याची वेळेत दखल घेणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यावर वेळेत उपचार देखील होऊ शकतात.

जास्त प्रमाणात तहान लागणं

शुगर जास्त असल्यावर शरीर तिचा साठा कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात लघवी करायला लागतं. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि तहान अधिक लागते. दिवसभर पाणी पीत राहूनही तहान भागत नाही विशेषतः रात्री उठून पाणी प्यावंसं वाटतं, तर हे लक्षात घेण्यासारखं लक्षण आहे.

वारंवार लघवी

जेव्हा रक्तातील साखरेची पातळी 180 mg/dL पेक्षा जास्त होते तेव्हा किडनी तिला लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे दिवसात अनेक वेळा लघवी लागणं, रात्री उठून लघवीसाठी जाणं सुरू होतं. यामुळे झोपेत व्यत्यय येतो आणि थकवा वाढतो.

सतत भूक लागणे

शरीरात साखर असली तरी ती पेशींमध्ये शोषली जात नाही कारण इन्सुलिन कमी असतं किंवा शरीर त्याला प्रतिसाद देत नाही. यामुळे मेंदूला ‘भूक’ असल्याचा सिग्नल मिळतो आणि व्यक्ती सतत खाण्याच्या शोधात असते. खाणं वाढलं तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही.

वजन अचानक कमी होणं

इन्सुलिनची प्रक्रिया नीट न झाल्यामुळे शरीर साखरेचा वापर ऊर्जा मिळवण्यासाठी करू शकत नाही. मग शरीर चरबी आणि स्नायू यांच्याद्वारे ऊर्जा मिळवतं. त्यामुळे अचानक वजन कमी झाल्याचं दिसून येतं. हे विशेषतः टाईप १ डायबेटिसमध्ये दिसतं.

थकवा आणि अशक्तपणा

शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी साखर महत्त्वाची असते. पण ती पेशींमध्ये शोषली न गेल्यामुळे शरीरात ऊर्जा कमी भासते. त्यामुळे थोडं काम केलं तरी थकवा जाणवतो. हे थकवा आणि सुस्ती रोजच्या कामात अडथळा निर्माण करू शकतं.

धुसर दिसणं

रक्तात साखर जास्त असल्यामुळे डोळ्यांतील पेशींपासून द्रव खेचला जातो, ज्यामुळे लेन्स फुगते आणि धुसर दिसू लागतं. हे सुरुवातीला तात्पुरतं असलं, तरी शुगरवर नियंत्रण न घेतल्यास डोळ्यांतील रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे डोळ्यांची तपासणी गरजेची आहे.

मधुमेहामुळे जास्त तहान लागण्याचे कारण काय?

रक्तातील जास्त साखर किडनी लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन तहान लागते.

वारंवार लघवी होण्याचे कारण काय?

रक्तातील साखरेची पातळी 180 mg/dL पेक्षा जास्त झाल्यावर किडनी ती लघवीतून बाहेर टाकते, त्यामुळे लघवीची वारंवारी वाढते.

सतत भूक लागण्याचे कारण काय?

इन्सुलिनच्या अभावामुळे साखर पेशींमध्ये जात नाही, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि मेंदूला भूक लागल्याचा संकेत मिळतो.

अचानक वजन कमी होण्याचे कारण काय?

इन्सुलिनच्या अभावामुळे शरीर साखरेचा वापर करू शकत नाही, त्यामुळे चरबी आणि स्नायू तोडून ऊर्जा मिळवते, ज्यामुळे वजन कमी होते.

मधुमेहामुळे डोळ्यांना काय त्रास होतो?

जास्त साखरेमुळे डोळ्यांच्या लेन्समध्ये द्रव गोळा होऊन ते फुगते, ज्यामुळे धुसर दिसते. लांबल्यास डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader Threat : भाजप नेत्यापासून मला आणि माझ्या आईचा जीवाला धोका; अभिनेत्रीने रडत रडत केली पोलिसांची पोलखोल

Maharashtra Live News Update : सिंहगडावर दोन दिवसांत १५ हजारांपेक्षा जास्त पर्यटकांची गर्दी

Flood Viral Video: डोक्यावर बाळ अन् मागे बायको; पुरातून वाट काढत जाणाऱ्या बापाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

Actress File Cyber Case: ७ महिन्यांच्या मुलाविरोधात निगेटिव्ह कमेंट्स; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री संतापली, थेट पोलिसात केली तक्रार दाखल

Bel Leaves: महादेवाला बेलाची पान का वाहतात?

SCROLL FOR NEXT