Stroke warning signs saam tv
लाईफस्टाईल

Early signs of stroke: शरीरात ही ५ लक्षणं दिसली तर समजा स्ट्रोक येऊ शकतो; संकेत ओळखून करा उपाय

Stroke symptoms recognize signs: स्ट्रोक हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये मेंदूकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. वेळेत उपचार न मिळाल्यास स्ट्रोक जीवघेणा ठरू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

जेव्हा आपण स्ट्रोक हा शब्द ऐकतो त्यावेळी बहुतेक लोकांच्या मनात डोकं धरून बसलेला किंवा अचानक जमिनीवर कोसळलेल्या व्यक्तीचं चित्र उभं राहतं. पण खरी गोष्ट अशी आहे की, सर्व स्ट्रोक हे वेदनांमुळे येत नाहीत. काही स्ट्रोक इतके सायलेंट असतात की व्यक्ती आपलं दैनंदिन काम करत राहते आणि त्याला हेही कळत नाही की त्याला स्ट्रोक झाला आहे.

स्ट्रोक कसा होतो?

स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह अचानक थांबतो किंवा मेंदूमधील रक्तवाहिनी फुटते. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मेंदूतील पेशी काही मिनिटांत मरायला लागतात. म्हणूनच डॉक्टर स्ट्रोकला “ब्रेन अटॅक” म्हणतात.

स्ट्रोकचे प्रकार

स्ट्रोकचे दोन मुख्य प्रकार आहेत

  • इस्केमिक स्ट्रोक- मेंदूमधील रक्तवाहिनी रक्ताच्या गुठळ्यामुळे बंद झाल्याने होतो. सर्व स्ट्रोकपैकी जवळपास 85% स्ट्रोक या प्रकारात मोडतात.

  • हॅमरेजिक स्ट्रोक- मेंदूमधील रक्तवाहिनी फुटल्याने रक्तस्त्राव होतो आणि त्यामुळे दाब वाढून मेंदूला हानी पोहोचते.

  • याशिवाय एक ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक (TIA) असतो. ज्याला “मिनी-स्ट्रोक” म्हणतात. यात रक्तप्रवाह काही मिनिटांसाठी थांबतो आणि नंतर पुन्हा सुरू होतो. पण हा मोठ्या स्ट्रोकचा गंभीर इशारा असतो.

स्ट्रोकची लक्षणं

अचानक अशक्तपणा किंवा मुंग्या येणं

चेहऱ्याच्या, हाताच्या किंवा पायाच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा किंवा मुंग्या येऊ शकतात. हसताना चेहरा वाकडा दिसणं किंवा हात वर उचलता न येणं ही लक्षणं असू शकतात.

बोलण्यात किंवा समजण्यात अडचण

बोलताना योग्य पद्धतीने न बोलणं, गोंधळ किंवा साध्या वाक्यांचा अर्थ न समजणं ही लक्षणं स्ट्रोकची असू शकतात. मेंदूतील भाषा नियंत्रित करणारा भाग प्रभावित झाल्याने शब्द गोंधळलेले येतात किंवा इतरांचं बोलणं समजत नाही.

दृष्टीदोष दृष्टी

धूसर होणे, गोष्टी डबल दिसणं किंवा एका/दोन्ही डोळ्यांत अचानक दृष्टी जाणं हे स्ट्रोकचे संकेत असू शकतात. या बदलांकडे अजिबात दुर्लक्षित करू नये.

अचानक चक्कर येणं

कोणतंही कारण नसताना अचानक चक्कर येणं, अस्थिर वाटणं किंवा चालताना अडचण होणं हे स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. मेंदूतील समन्वय नियंत्रित करणाऱ्या भागाला पुरेसा रक्तप्रवाह मिळत नसल्याने असं होतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४८ दशलक्ष रोजगार अन् ४.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक; हरित अर्थव्यवस्थेमुळे भारतातील तरुणांना नोकऱ्यांची सुवर्णसंधी

निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाहीच, ठरलेल्या वेळेतच धुरळा उडणार, कोर्टाकडून महत्त्वाचे निर्देश

Kiara-Sidharth: आमच्या बाळाचं नाव काय? सिद्धार्थ कियाराने शेअर केलं त्यांच्या मुलीचं क्यूट नाव

Garuda Purana: मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसू लागतात हे संकेत; गरूड पुराणात सांगितली महत्त्वाची माहिती

Kalyan : संतापजनक! शिवीगाळ केली, धमकी दिली, कारागृहात कैद्याचा हवालदारावर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT