Diagnose a cancerous lump SAAM TV
लाईफस्टाईल

Lymph Node Health Problems: शरीराच्या 'या' 4 भागांमध्ये गाठ दिसल्यास असू शकतो गंभीर कॅन्सर; कसं कराल निदान?

Diagnose a cancerous lump: शरीरावर गाठ दिसणं हे नेहमीच कॅन्सरचं लक्षण नसतं. अनेकदा त्या सामान्य चरबीच्या गाठी, संसर्ग किंवा सूज असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्याला आपलं शरीर अनेक आजारांचे संकेत देतं. मात्र यामागील अनेक लक्षणांकडे आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो. अशावेळी शरीरात एखादी गाठ दिसली तरी त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. ज्यावेळी वेदना जाणवतात तेव्हा त्याकडे लक्ष दिलं जातं. मात्र तोपर्यंत उशीर झाले असतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, शरीराच्या काही भागांमध्ये दिसणारी गाठ नेहमीच साधी समस्या नसते. काही वेळा ती लिम्फ नोड सारख्या संकेत असू शकते. त्यामुळे शरीरात जर गाठ दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

जबड्याखाली गाठ असेल

अनेक लोकांना जबड्याखाली वारंवार गांठ लागते. मात्र ती काही दिवसांनी पुन्हा नाहीशी होते. मुळात हा भाग लिम्फ नोड्सशी संबंधित असल्याने याठिकाणी दिसणारी गाठ कधी कधी गंभीर आजाराचं लक्षण असू शकते. यात लिम्फ नोड कॅन्सर किंवा लिम्फ नोड इन्फेक्शनही असू शकतं.

काखेजवळ असणारी गाठ

अंडरआर्म्सखाली किंवा आसपासच्या भागात वेदना होणं आणि गाठ तयार होणं याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. हे लिम्फ नोड्सशी संबंधित आजाराचे संकेत असू शकतात. विशेषतः काखेजवळ सूज आलेली गाठ लिम्फ नोड्समध्ये संसर्ग किंवा कॅन्सरचं लक्षण असू शकते.

मानेजवळ असलेली गाठ

मान हा लिम्फ नोड्सचा प्रमुख भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी कॅन्सरची लक्षणं किंवा संसर्ग झाल्यास सूज, गाठ आणि वेदना जाणवू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कानाच्या मागील गाठ

लिम्फ नोड्सशी संबंधित आजारांमुळे विशेषतः लिम्फ नोड्स कॅन्सर किंवा संसर्गामुळे, कानामागे वेदना किंवा सूज दिसू शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार वाढू शकतो

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT