cholesterol symptoms in nails SAAM tv
लाईफस्टाईल

Nail changes: नखांमध्ये हे 5 बदल दिसले तर समजा नसांमध्ये भरलंय वाईट कोलेस्ट्रॉल; चुकूनही दुर्लक्ष करू नका

cholesterol symptoms in nails: नखांमध्ये काही विशिष्ट बदल दिसल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल साचल्याचे लक्षण असू शकते. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये असं म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे बरेच आजार आपल्या मागे लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जाणवणारी एक समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल. चुकीच्या आहारमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू लागतं. यामुळे हार्ट डिसीज आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल वाढलं की त्याची लक्षणं दिसून येतात. फार कमी लोकांना माहिती असेल पण आपल्या नखांवरही कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण दिसून येतं. ही लक्षणं ओळखून उपचार घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊया नखांवर कोणती लक्षणं दिसून येतात.

नखांवर उभ्या रेषा दिसून येणं

जर तुमच्या नखांवर उभ्या रेषा दिसत असतील तर सावध व्हा. याला ओन्कोरेक्सिस म्हणतात. पोषक घटकांची कमतरता आणि अशक्तपणा हे त्याचं कारण असू शकतं. हाय कोलेस्टेरॉल तुमच्या रक्त प्रवाहावर परिणाम करत. ज्यामुळे अनेकदा नखांमध्ये बदल होतात.

नखं वाकणं

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की तुमच्या नखांमध्ये बदल होतो. यामध्ये नखं काहीशी वाकलेली दिसू शकतात. हाय कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात दीर्घकाळ ऑक्सिजनची कमतरता जाणवते. त्यामुळे हा बदल दिसू शकतो.

नखं निळी पडणं

कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात जमा झाल्यावर नखं निळी पडू लागतात. अशावेळी नखं लगेच तुटूही लागतात. अशावेळी कोलेस्ट्रॉल तपासून घ्यावं.

नखं पिवळी दिसणं

वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झाल्यास तुमची नखं पिवळी दिसू शकतात. हे नखांमध्ये रक्ताभिसरण योग्य प्रमाणात न झाल्यास दिसून येतं. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

नखं वाकडी होणं

अधिकतर हा त्रास पायांच्या नखांमध्ये दिसून येतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर पायापर्यंत ब्लड सर्क्युलेशन होत नाही. त्यामुळे नखांची वाढ हळू होते आणि वाकडी होऊ लागते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Apply Mascara: मस्कारा लावताना या 5 चुका टाळा; डोळे दिसतील टप्पोरे आणि सुंदर

Bank Election 2026 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका जाहीर, RBIच्या निर्देशांमुळे जुने संचालक अडचणीत; वाचा सविस्तर

Gautam Gambhir: इंदूरच्या मैदानावर लागले 'गौतम गंभीर हाय-हाय'चे नारे; चाहत्यांचा संताप पाहता विराटने केलं असं कृत्य की...! Video viral

Skin Care : मेकअप न करताही मिळेल चेहऱ्यावर गुलाबी चमक, ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

SCROLL FOR NEXT