Vastu tips for home roof saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: घराच्या छतावर 'या' गोष्टी ठेवत असाल तर व्हाल कंगाल; आर्थिक समस्याही लागतील मागे

Vastu tips for home roof: घराच्या आतल्या भागाची आपण काळजी घेतो, पण अनेकदा घराच्या छतावर (टेरेसवर) ठेवलेल्या वस्तूंवर आपण लक्ष देत नाही. वास्तूशास्त्रानुसार, काही वस्तू छतावर ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक समस्या वाढतात.

Surabhi Jayashree Jagdish

घर घेतल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात कोणताही दोष नसावा. मात्र असे काही वास्तू दोष असतात जे घरातील छताशी निगडीत असतात. जर तुमच्या आयुष्यात अचानक हानी, आर्थिक समस्या, कलेश, अपघात या गोष्टी घडत असतील तर तुम्ही तुमच्या छताकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

अनेकदा आपण नकळत अशा काही गोष्टी छतावर ठेवतो ज्यामुळे नकारात्मक उर्जा आपल्याकडे आकर्षित होते. वास्तू शास्त्र आणि लाल किताबनुसार, काही गोष्टी तुमच्या छतावर असू नयेत. या गोष्टी तुमच्या घरातील शांती भंग करतात.

छतावर खुर्ची ठेवू नका

अनेकदा आपण एकादा सोफा किंवा खुर्ची छतावर नेऊन ठेवतो. मात्र असं करणं धोकादायक आहे. यामुळे केतू दोष उत्पन्न होतो. ज्यामुळे घरातील लोकांचा मानसिक तणाव, धन हानी आणि घरातील भांडणं वाढू शकतात.

जुनं फर्निचर

अनेकजण जुनं फर्निचर घराच्या छतावर नेऊन ठेवतात. मात्र यामुळे शनी दोष वाढू लगतो. शनीचा नकारात्मक प्रभाव कुटुंबामध्ये आर्थिक संकटं, कोर्टाच्या समस्या घेऊन येतो.

जुने टायर्स

गाडीचे जुने टायरही अनेकजण घराच्या घतावर नेऊन ठेवतात. मात्र असं केल्याने बुध ग्रहाचा नाकारात्मक प्रभाव वाढतो. यामुळे व्यापारात नुकसान, मुलांच्या शिक्षणात बाधा, मानसिक ताणतणाव या गोष्टींचा सामना करावा लागतो.

पाण्याची टाकी घाण ठेऊ नका

जर तुमच्या छतावर पाण्याची टाकी असेल तर ती वेळोवेळी साफ राहील याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. जर पाण्याची टाकी घाण असेल तर चंद्र दोष उत्पन्न होऊ शकतो. यामुळे झोप, मानसिक ताण या समस्या अधिक होऊ शकतात. पिवळ्या रंगाची टाकी छतावर ठेवणं योग्य मानलं जातं.

छतावर कुत्र्याला बांधू नका

काहींच्या घरात कुत्रा असतो आणि अनेकजण कुत्र्याला छतावर बांधून ठेवतात. मात्र वास्तूनुसार हे अशुभ मानलं जातं. यामुळे शनी आणि राहू दोष निर्माण होतो. ज्यामुळे कुटुंबामध्ये आर्थिक संकटं, आजारपण आणि भांडणं होऊ लागतात. त्यामुळे घरात कुत्रा असेल तर त्याला मोकळं सोडलं पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Printed Kurta Sets: कम्फर्टेबल फिटींग आणि स्टायलिश लूकसाठी आजच 'हे' प्रिंटेड कुर्ता सेट ऑर्डर करा

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

Election : यंदा गुलाल कुणाचा? पंचायत समिती सभापती, उपसभापतीचे आरक्षण जाहीर, वाचा यादी

Skin Care Tips: बटाटा त्वचेवर लावल्याने होतील 'हे' साइड इफेक्ट्स, जाणून घ्या

गुलाबजाम, रसगुल्ला आणि जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात?

SCROLL FOR NEXT