How do you relieve heartburn, Home remedies, health tips for heartburn ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

काहीही खाल्ल्यानंतर छातीत सतत जळजळ होतेय तर हे घरगुती उपाय करुन पहा

छातीत सतत जळजळ होतेय तर हे उपाय करा.

कोमल दामुद्रे

मुंबई : अन्नाचा पहिलाच घास खाल्ला आणि छातीत जळजळ सुरू झाली यामुळे अनेक जण आजकाल त्रस्त आहेत. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याची चुकीची वेळ, सतत जंक फूड किंवा मसालेदार (Spices) व तेलकट पदार्थांचा अभावामुळे आपल्याला याचा त्रास सहन करावा लागतो.

हे देखील पहा -

छातीत सतत जळजळत असेल तर आपल्याला काहीही खाण्याचे मन करत नाही. अशावेळी विशेषतः संध्याकाळी अति खाणे टाळा. खूप लवकर खाल्ल्याने ऍसिड रिफ्लक्स होऊ शकते. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. वजन अति वाढल्यासही छातीत जळजळ होऊ शकते. चिंता व तणावामुळे ही जळजळ होते तसेच धूम्रपान, मद्यपान, कॅफीन, मसालेदार अन्न, चॉकलेट, टोमॅटो-आधारित उत्पादने, पेपरमिंट आणि कार्बोनेटेड शीतपेये यांचे जास्त सेवन करणे टाळा. वारंवार छातीत जळजळ होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. परंतु, काही घरगुती उपाय करुन आपण ही जळजळ थांबवू शकतो.

१. पिकलेल्या केळीत (Banana) पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे पोटातील ऍसिडचा प्रतिकार होतो. छातीत जळजळ होत असेल तर आपण पिकलेले केळे खायला हवे.

२. छातीत जळजळ होत असेल तर शुगर फ्री च्युइंग गम खावे. च्युइंग गम खाल्ल्याने लाळेचे उत्पादन वाढते. त्यामुळे आम्लाची पातळी कमी होऊन छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होते.

३. मधल्या वेळेत भूक लागत असेल तर जंक फूड खाण्याऐवजी आपण चार्टचे सेवन करावे. चार्टमध्ये मसालेदार पदार्थांचा समावेश करु नका. हेल्दी चार्टचे सेवन केल्यास जळजळचे प्रमाण कमी होईल.

४. वारंवार छातीत जळजळ होत असेल तर आपण अधिक प्रमाणात खाऊ नये. अन्न चाऊन खा. एकाच वेळी सगळे पदार्थ खाऊ नका. खाण्याची योग्य वेळ ठेवा.

५. छातीत जळजळ होत असेल तर आपण अधिक घट्ट कपडे घालणे टाळा. यामुळे पोटावर दाब येतो व अन्नपदार्थाचे नीट सेवन होत नाही.

६. झोपायला जाण्यापूर्वी ३ तासाआधी खा. जेवल्यानंतर लगेच झोपा. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने छातीत जळजळ होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live : ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं उघडलं, बार्शीत एकाच प्रभागात २ उमेदवार विजयी

Shocking : ३ कोटींच्या इन्श्यूरन्ससाठी पोटची २ मुलं बनली हैवान; वडिलांनाच मारण्यासाठी सोडला विषारी साप अन्...

मनमाड मतमोजणी केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा, नेमके काय घडले? VIDEO

Nagarparishad Election Result: सुरूवातीचे कल हाती! महायुती १९० पालिकांमध्ये आघाडीवर, महाविकास आघाडीची स्थिती काय?

Gold Rate Today: सोन्याचे दर जैसे थे वैसे! १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT