शरीरात मीठाचे प्रमाण जास्त झाले तर, अकाली मृत्यू येण्याची शक्यता

जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
side effects of eating too much salt
side effects of eating too much saltब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आपण कितीही चविष्ट जेवण बनवले आणि त्यात मीठच घालायला विसरलो तर ते अळणी किंवा बेचव लागू शकते.

हे देखील पहा -

आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवणात किंवा कोणत्याही आंबट-गोड पदार्थावर सतत मीठ घालून खाण्याची सवय असते. अतिरिक्त मीठ आपल्या शरीराला हानी पोहचवू शकते. ज्यांना जेवणात अतिरिक्त मीठ खाल्ल्याने अकाली मृत्यूचा धोका २८ टक्के वाढू शकतो. यात ५० वर्षे वयोगटातील पुरुष व स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. मीठाचे प्रमाण अधिक झाल्यास वय, लिंग, वांशिकता, बॉडी मास इंडेक्स, धूम्रपान, अल्कोहोल सेवन, आहार आणि मधुमेह, कर्करोग आणि हृदयरोग यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, उच्च सोडियमचा वापर हा दिवसभरात २ ते ५ ग्रॅमपेक्षा अधिक नसावा तर पोटॅशियमचे अपुरे सेवन हे ३.५ ग्रॅमपेक्षा कमी असावे. नाहीतर आपल्याला उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांना बळी पडावे लागू शकते. तसेच प्रौढांनी दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मिठाचे सेवन करावे. रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, स्ट्रोक आणि कोरोनरी हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते असे जागतिक (World) आरोग्य संस्थेने सुचवले आहे.

side effects of eating too much salt
पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या औषधी वनस्पती उपयोगी ठरतील

जास्त मीठ खाल्ल्याने आपल्या शरीरात अतिरिक्त पाणी (Water) साठून राहते. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.त्यामुळे रक्तवाहिन्या कडक आणि अरुंद होऊ शकतात मुख्य अवयवांना रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह मर्यादित करून हृदयावर ताण येतो, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासह अनेक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होऊ शकतात व आपल्याला अकाली मृत्यू येऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com