stomach pain causes google
लाईफस्टाईल

Stomach pain causes: वारंवार पोटदुखी होतेय तर दुर्लक्ष करू नका; हे गंभीर आजार करतायत तुमच्या शरीरात घर

Frequent stomach pain causes: डॉक्टरांच्या मते, वारंवार पोटदुखी होणं ही साधी समस्या नसून ती गंभीर आजारांचं लक्षण असू शकते. अनेकदा लोक पोटदुखीकडे दुर्लक्ष करतात पण वेळेत उपचार न घेतल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

पोट दुखतंय म्हणून तुम्ही डॉक्टरकडे जाता का? यावर अनेकांचं उत्तर नाही असेल. पण आता आम्ही तुम्हाला कोणत्या आजारांमुळे पोटदुखी होते हे सांगितलं तर तुम्ही पुढच्यावेळी नक्की डॉक्टरांकडे धाव घ्याल. आपण अनेकदा पोटदुखीला सामान्य कारण समजून पुढे जातो. यावेळी कदाचित गॅस झाला असेल किंवा जास्त खाल्लं असेल म्हणून पोटदुखी होते, असा विचार आपण करतो. पण पोटदुखी ही अनेक आजारांची लक्षणं असू शकते.

शरीरात कोणतीही समस्या असेल तरी आपल्याला काही ना काही लक्षणं दिसतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. काही तास पोटदुखी झाली आणि नंतर बरी झाली तर आपण त्याकडे लक्ष देत नाही. मात्र या वेदना आठवडा किंवा महिने टिकल्या तर ते गंभीर आजाराचं संकेत असू शकतं.

सतत पोटदुखी का होते?

आपल्या पोटात आतडे, लिव्हर, किडनी आणि प्रजनन अवयव असे अनेक महत्त्वाचे अवयव असतात. त्यामुळे पोटदुखीचं कारण शोधणं सोपं नसतं.

पोटदुखीची काही कारणं

Irritable Bowel Syndrome (IBS)

मोठ्या आतड्यावर परिणाम होतो. लक्षणं- पोटात गोळा येणं, गॅस, वारंवार शौचाला जाणं.

Acid Reflux किंवा GERD

यामध्ये एसिडीटीचा त्रास होऊन वारंवार उलट्या होतात. त्याचप्रमाणे छातीत जळजळही होते.

Gastritis आणि Peptic Ulcer

पोटाच्या आतील आवरणात सूज किंवा अल्सर होतो. हा त्रास जास्त अँटीबायोटीक्स औषधं घेण्यामुळे होऊ शकतं

डायव्हर्टिकुलिटिस

यामध्ये मोठ्या आतड्यातील लहान पिशव्यांना संसर्ग होतो. अशावेळी वेदना साधारणपणे डाव्या बाजूला होऊ लागतात.

इतर गंभीर कारणं

पित्ताशयातील खडे

यामध्ये उजव्या बाजूला तीव्र वेदना होतात. हा त्रास खासकरून तेलकट पदार्थ खाल्ल्यावर होतो.

किडनी स्टोन

किडनी स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तींना पाठीपासून खालच्या पोटापर्यंत तीव्र वेदना होतात.

हर्निया

पोटात गाठ दिसून वेदनाही होतात. या वेदना सामान्यपणे खोकल्यावर किंवा वजन उचलल्यावर वाढते.

कॅन्सर

पोटात सतत वेदना, वजन कमी होणं किंवा रक्तस्त्राव झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल?

  • अचानक तीव्र वेदना

  • उलटी, ताप

  • शौचातून किंवा उलटीतून रक्त दिसणं

  • झपाट्याने वजन कमी होणं

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani : दिशा पाटनीने दिली प्रेमाची कबुली? इव्हेंटमध्ये तलविंदर सिंहचा हात धरून फिरताना दिसली, पाहा VIDEO

Surya Grahan 2026: या दिवशी लागणार वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण; पाहा कोणावर पडणार याचा अधिक प्रभाव

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! लाखो रुपयांचा एरियर मिळणार; पगार कितीने वाढणार?

Maharashtra Live News Update: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज

Cyclone : अमेरिकेत हिमवादळाचे तांडव, २५ जणांचा मृत्यू, लाखो घरांचा वीजपुरवठा खंडित

SCROLL FOR NEXT