Side Effects Of Alcohol Consumption, Alcohol Side Effects On Body, Alcohol Effects On Liver ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

ही लक्षणे सतत दिसत असतील तर, आपल्याला होऊ शकतो गंभीर आजार

यकृताच्या कार्यास धोका निर्माण करणारे घटक कोणते?

कोमल दामुद्रे

मुंबई : आपण सेवन केलेल्या अनेक घटकांमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ज्यात जास्त प्रमाण हे मद्यपानाचे आहे. याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास यकृतावर त्याचा परिणाम होतो. (Alcohol Effects On Liver)

हे देखील पहा -

मद्यपान व वाढलेले वजन यामुळे आपल्या यकृतावर याचा परिणाम दिसू लागतो. सतत मद्यपान केल्यामुळे यकृतामध्ये जळजळ होऊ लागते व त्याला सूजही येते. यकृताला संसर्ग झाल्यास यकृताच्या कार्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रक्तातील (Blood) विषारी पदार्थ काढून टाकणे, रक्तातील साखरेची पातळी राखणे, पित्त तयार होणे, रक्ताच्या प्लाझ्मासाठी प्रथिने तयार करणे आणि इतर सर्व महत्वाची शारीरिक कार्ये बिघडतात.

हृदय आणि मेंदू यांसारख्या आजारांची लक्षणे दिसत नाही तसेच यकृताच्या आजाराचे लक्षण सुरूवातीला दिसत नाही. या आजारांचा परिणाम माणसांच्या दैंनदिन जीवनावर हळूहळू होऊ लागतो. याची लक्षणे सुरुवातीच्या काळात सौम्य व सामान्य दिसू लागतात. सतत मूड बदलणे, अस्वस्थतता जाणवणे, कामात मन न लागणे यांसारखी लक्षणे जाणवू लागतात. तसेच थकवा, वजन कमी होणे, गुडघे दुखणे, ओटीपोटात सूज, भूक न लागणे, पिवळसर डोळे आणि त्वचा, रक्ताच्या उलट्या व सतत तहान लागणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. (Alcohol Side Effects On Body)

यकृताच्या कार्यास धोका निर्माण करणारे घटक हे आनुवंशिक असतात किंवा आपण चुकीच्या सवयींमुळे हा त्रास जाणवू लागतो. वाढणारे वजन, औषधांचा दुष्परिणाम, यकृतामध्ये चरबी साठते व आपला त्रास अजून वाढू लागतो. यासाठी ठराविक वयानंतर आपल्याला आरोग्याची (Health) नियमित तपासणी करायला हवी. आपल्याला जो काही त्रास होत असेल तो डॉक्टरांना सांगायला हवा. तसेच वेळेत औषधोपचार करायला हवे. (Side Effects Of Alcohol Consumption)

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Tourism : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा

Divya Deshmukh : 'बुद्धीबळाची राणी' दिव्यावर पैशांचा वर्षाव; 'वर्ल्ड चॅम्पियन'ला किती रक्कम मिळाली? वाचा

WhatsApp New Feature: व्हॉट्सॲप चॅटमध्ये बदल होणार, वापरकर्त्यांना 'हे' नवीन अपडेट मिळणार

Pune Shocking: 'आई-बाबा माफ करा'! ७ व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी IT इंजिनिअर पियुषची भावनिक चिठ्ठी

Maharashtra Live News Update: भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांच्या गर्दीचा उद्रेक

SCROLL FOR NEXT