How to help teen, Parenting tips, causes of teenage depression
How to help teen, Parenting tips, causes of teenage depressionब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

किशोरवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या नैराश्याची कारणे कोणती ? त्यावर मात कशी कराल ?

किशोरवयीन अवस्थेतील मुलांना कशाप्रकारे सांभाळाल ?
Published on

मुंबई : किशोरवयीन अवस्था ही सगळ्या अवस्थेपेक्षा वेगळी असते. या अवस्थेत मुलांच्या मनावर चांगले व वाईट परिणाम होत असतात. या वयात मुलांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो.

हे देखील पहा -

या वयात मुलांना भयंकर आव्हाने, परीक्षा व अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो. यासाठी पालकांनी या वयात मुलांची काळजी घ्यायला हवी. या वयात मुलांच्या व पालकांच्या मतामध्ये बरेच फरक जाणवू लागतात. आपल्या मुलांसाठी आपण काही काळापर्यंत सीमा निश्चित करायला हवे. त्यांना स्वंतत्र कसे बनवता येईल यावर भर द्या.

किशोरवयात मुलांच्या मनात उदासिनता, भावनिक व वर्तनात्मक बदलाच्या रुपात प्रकट होऊ शकते. मुलांमध्ये नैराश्य आल्यानंतर अचानक रडू लागतात, मनःस्थिती बदलणे, चिडचिड होणे, स्वारस्य कमी होणे ही भावनात्मक बदलांची काही उदाहरणे आहेत. त्याच्या वर्तुणीकीतली बदलात ते अतिशय थकलेले दिसतील. ती सतत झोपणे, शाळेत जाण्यास नाटक करणे, भूक कमी लागणे किंवा वाईट व्यसनाना बळी पडणे यासारखी लक्षणे दिसू लागतात.

How to help teen, Parenting tips, causes of teenage depression
मानसिक ताण व डिप्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी 'डाएट' मध्ये या पदार्थांचे समावेश करा

अशा अवस्थेत पालक (Parents) म्हणून आपण मुलांची (Child) मदत करू शकतो. आपण मुलांशी संवाद साधायला हवा. त्यांचा दिवस कसा गेला याबाबत त्यांना विचारा. तसेच, बोलताना त्याच्या शारीरिक व मानसिक हालचालीवर लक्ष ठेवा. त्यांना संकटाना सामोरे जाण्यास मदत करा. त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या भीतीवर मात कशाप्रकारे करता येईल हे त्यांना समाजावून सांगा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com