Leg symptoms of heart problems saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack Symptoms: हाता-पायांवर ही लक्षणं दिसली तर हार्ट अटॅक येऊ शकतो; उशीर करणं पडेल महागात

Heart attack symptoms hands feet: हृदयविकाराची लक्षणे अनेकदा छातीत दुखण्याशी जोडली जातात. मात्र डॉक्टरांच्या मते, हात-पायांवर दिसणारी काही बदलही हृदयविकाराचा गंभीर इशारा देतात.

Surabhi Jayashree Jagdish

हार्ट अटॅक म्हटलं की, तो प्रौढ व्यक्तींना होतो असा एक समज आहे. मात्र आजकाल तरूणांना देखील हार्ट अटॅक येत असल्याचं समोर आलं आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे या प्रमाणात वाढ झाली आहे. आपल्याला वाटतं की, हार्ट अटॅक अचानक येतो. पण प्रत्यक्षात तुमचं शरीर तुम्हाला संकेत देत असतं.

हार्ट अटॅक येण्यापूर्वी चेहरा, बोटं किंवा पायांमध्ये काही बदल दिसून येतात. ही लक्षणं नेमकी काय आहेत ती जाणून घेऊया. ज्यामुळे तुम्हाला यावर वेळीच उपाय करणं सोपं होतं.

बोटं किंवा पायांमध्ये गाठी

Endocarditis नावाच्या समस्येमध्ये हृदय किंवा रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. अशावेळी बोटं किंवा पायांमध्ये गाठी दिसतात. या गाठी काही तास टिकतात किंवा काही दिवसांत आपोआप निघून जातात.

ओठ फुटणं

लहान मुलांना जर पुरळ, ताप किंवा ओठ कोरडं पडण्याचा त्रास असेल तर तो हृदयविकार असू शकतो. यामध्ये ओठातून रक्तस्राव होत असेल तर तर ते Kawasaki Disease मुळे होऊ शकतं. ही समस्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करते. ६ महिने ते ५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ही समस्या दिसते.

नखं वाकणं

हार्ट अटॅकचे संकेत नखांवरही दिसून येतात. यामध्ये जर तुमची नखं खाली वाकलेली दिसत असतील आणि बोटांच्या टोकांवर सूज दिसत असेल तर ते हृदयाचा संसर्ग, हृदयविकार किंवा फुफ्फुसाचा आजाराचे संकेत असू शकतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

त्वचेवर मेणासारखा थर येणं

डोळ्यांच्या पापण्यांभोवती पिवळसर-केशरी रंगाचे मेणासारखे थर दिसत असतील तर सावध व्हा. कारण हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं. हे थर केवळ डोळ्यांभोवतीच नाही तर हातांच्या रेषांवर किंवा पायांच्या मागील भागावरही दिसू शकतात. कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्यास हार्ट अटॅकचा धोका असतो.

पायांमध्ये सूज येणं

जर पाय किंवा पोटऱ्यांमध्ये सूज दिसली तर ते हृदय योग्य पद्धतीने काम करत नसल्याचं लक्षण मानलं जातं. American Academy of Dermatology Association च्या माहितीनुसार, पायांमध्ये पाणी साचल्यामुळे सूज येते आणि ती वरच्या पायांपर्यंत किंवा कंबरेपर्यंतही पसरू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार

Pink Blouse Designs: गुलाबी रंगाच्या ब्लाऊजचे हे 5 लेटेस्ट पॅटर्न, सिंपल साडीतही तुम्हीच उठून दिसाल

Ajit Pawar: 'खरी शिवसेना ठाकरेंची', अजित पवारांचा जुना VIDEO पुन्हा चर्चेत

Strawberry Shake: हिवाळ्यात प्या थंडगार स्ट्रॉबेरी मिल्कशेक; सोपी रेसिपी घरीच करा ट्राय

Rosemary Oil For Hair : सगळे उपाय करुनसुध्दा केस गळणे थांबत नाही, मग वापरुन बघा हे गुणकारी रोझमेरी तेल

SCROLL FOR NEXT