Surabhi Jayashree Jagdish
दररोज फक्त १ मिनिट चालणं ही खूप छोटी सवय वाटत असली तरी तिचा शरीरावर मोठा आणि सकारात्मक परिणाम दिसून येतो. शरीराला हालचाल मिळाल्याने हृदय, मेंदू आणि स्नायू यांची कार्यक्षमता वाढते.
दिवसभर बसून राहण्यामुळे होणारे दुष्परिणामही कमी होतात. ही सवय लहान असली तरी नियमित ठेवली तर ती आरोग्यासाठी मोठं गुंतवणूक ठरते. जाणून घेऊया दररोज एक मिनिट जरी चाललात तरी काय फायदे होतात?
१ मिनिट चालल्याने शरीरात रक्तप्रवाह वेगाने सुरू होतो. यामुळे हृदय हलकेपणाने एक्टिव्ह राहतं. रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारते.
दिवसभर बसून असलेल्या लोकांच्या स्नायूंमध्ये ताण जमतो. एक मिनिटाची चाल त्या स्नायूंना रिलॅक्स करतं. त्यामुळे stiffness कमी होते.
थोडीशी चाल देखील मेंदूकडे ऑक्सिजनचा पुरवठा वाढवते. यामुळे एकाग्रता वाढते आणि थकवा झटक्यात कमी होतो. मानसिक ताजेतवानेपणा वाढतो.
हलक्या हालचालीमुळेही कॅलरी बर्न होतात. दिवसातून अनेकदा असे १-१ मिनिट चालल्यास मेटाबॉलिझम एक्टिव्ह राहतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
विशेषतः जेवणानंतर १ मिनिट चालल्यास अन्न पचन सोपं होतं. ऍसिडिटी, गॅस किंवा पोटफुगी कमी होते. शरीर पचनासाठी अधिक कार्यक्षम बनते.
थोडंसं चालणंही शरीरात 'फील गुड' हार्मोन्स स्रवले जातात. त्यामुळे तणाव आणि मानसिक ताण हलका होतो.