Pitru Paksha 2026 saam tv
लाईफस्टाईल

Pitru Paksha 2026: घरात अकाली मृत्यू झाला असेल, तर पितृपक्षात नक्की करा हे ३ उपाय; दिवंगत आत्म्याला मिळेल मोक्ष!

Pitru Paksha 2026 Moksha Upay: पितृपक्षात अकाल मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी चतुर्दशी श्राद्ध करण्याची धार्मिक परंपरा आहे. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी चतुर्दशी श्राद्ध असून तर्पण, श्राद्ध आणि भगवान शिवाच्या अभिषेकासंबंधीच्या धार्मिक मान्यता जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

पितृपक्ष सुरू असून या काळात पितरांचं स्मरण, तर्पण आणि श्राद्ध केलं जातं. हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि संपूर्ण पंधरा दिवस याठिकाणी राहतात, अशी धार्मिक मान्यता आहे. पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी या काळात तर्पण, पिंडदान, श्राद्ध तसंच अन्न आणि वस्त्रदान करण्यात येतं.

ज्या व्यक्तीचा मृत्यू आयुष्य पूर्ण झाल्यानंतर होतो त्यांचं श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केलं जातं. मात्र एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कमी वयात किंवा अचानक झाला असेल तर अशा व्यक्तींसाठी पितृपक्षात विशेष तिथी सांगितलीये. या दिवशी त्यांचं श्राद्ध आणि तर्पण केलं जातं. तसंच काही विशेष धार्मिक उपायही केले जातात. यामुळे अशा पितरांना शांती मिळते आणि ईश्वराच्या कृपेने मोक्ष मिळावा, अशी श्रद्धा आहे.

अकाल मृत्यू म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीचे आयुष्य पूर्ण होण्यापूर्वीच मृत्यू झाला तर त्याला अकाल मृत्यू असं म्हटलं जातं. अपघात, आगीची दुर्घटना, गंभीर किंवा असाध्य आजार, विषप्राशन किंवा आत्महत्येमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचं आयुष्य पूर्ण झालं नाही तर अशा मृत्यूचा समावेश अकाल मृत्यूमध्ये केला जातो.

अकाल मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी पितृपक्षात काय करावं?

तज्ज्ञांच्या मते, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अकाल मृत्यू झाला असेल तर पितृपक्षाच्या १५ दिवसांत श्रीमद्भागवत पुराणातील महात्म्याचा पाठ करावा किंवा तो ऐकावा. धार्मिक मान्यतेनुसार, असं केल्याने त्या जीवात्म्याला मोक्ष मिळण्यास मदत होते.

अकाल मृत्यू झालेल्या पितरांसाठी पितृपक्षात चतुर्दशी तिथीला तर्पण आणि श्राद्ध करण्याची परंपरा आहे. या श्राद्धाला चतुर्दशी श्राद्ध असं म्हटलं जातं. चतुर्दशी तिथी भगवान शिवाला समर्पित आहे. भगवान शिवाच्या कृपेने अकाल मृत्यूचा योग असलेली व्यक्तीही दीर्घायुष्य प्राप्त करू शकते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

यंदा ९ ऑक्टोबरला चतुर्दशी श्राद्ध

यंदा ९ ऑक्टोबरला चतुर्दशी श्राद्ध केलं जाणार आहे. पंचांगानुसार, चतुर्दशी तिथी ८ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुरू होऊन ९ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहणार आहे. चतुर्दशी श्राद्धासाठी कुतुप मुहूर्त सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत आहे. हा मुहूर्त ४७ मिनिटांचा आहे. त्यानंतर रौहिण मुहूर्त दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांपासून १ वाजून १८ मिनिटांपर्यंत राहणार असून, तोही ४७ मिनिटांचा आहे.

भगवान शिवाचा अभिषेक करा

चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी सकाळी स्नान करून एका तांब्यात गंगाजल घ्यावं. त्यात पवित्र जल आणि काळे तीळ टाकावेत. त्यानंतर ज्या व्यक्तीचा अकाल मृत्यू झाला आहे, त्या व्यक्तीचं स्मरण करून त्या जलाने भगवान शिवाचा अभिषेक करावा.

यानंतर भगवान शिवाकडे प्रार्थना करावी की, कुटुंबातील ज्या व्यक्तीचा अकाल मृत्यू झाला आहे त्यांना मोक्ष मिळावा आणि या पूजेचं पुण्य त्यांना मिळावं. धार्मिक श्रद्धेनुसार, या उपायामुळे अकाल मृत्यू झालेल्या पितरांना शांती मिळण्यास मदत होते.

डिस्क्लेमर

या बातमीमध्ये हिंदू धार्मिक परंपरेत आढळणारी माहिती देण्यात आली आहे. यातील उल्लेख हे धार्मिक ग्रंथ व श्रद्धांवर आधारित असून, त्यांना वैज्ञानिक तथ्य किंवा सिद्ध झालेले सत्य म्हणून घेऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट, पश्चिम रेल्वेची कारवाई; पाहा Video

Shivali Parab: 'नाजूक ही नार...'; मराठमोळ्या लूकमध्ये शिवाली परबचं खुललं सौंदर्य

Maharashtra News Live Update : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

Latest Mangalsutra Designs: रोज घालण्यासाठी सुंदर आणि युनिक डिझाईन्सचे 5 मंगळसूत्र

Heart blockage symptoms: ही 5 लक्षणं दिसली तर समजा की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात; हार्ट अटॅक येण्यापूर्वी लक्ष द्या

SCROLL FOR NEXT