Home care, Monsoon care tips, how to get rid of house flies naturally
Home care, Monsoon care tips, how to get rid of house flies naturally ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Monsoon Tips: पावसाळ्यात घरात माशा येण्याचे प्रमाण वाढले आहे तर हे उपाय करुन पहा

कोमल दामुद्रे

मुंबई : पावसाळा म्हटलं की, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना हा ऋतू आवडत असतो. पावसाळ्यात सगळीकडे पाणी साचल्यामुळे आपली अधिकतर चिडचिड होते परंतु, वातावरणातल्या गारव्यामुळे प्रसन्नही वाटते.(how to get rid of house flies naturally)

हे देखील पहा -

पावसाळा आला की, साथीच्या रोगांना आमंत्रण मिळते. पावसाळ्यात डास, माशा व विविध आजारांनी आपण ग्रस्त असतो. सतत सर्दी- खोकल्याचे प्रमाण वाढते. बाहेरून घराच्या आत रोगजंतू येत असतात. त्यामुळे आपली अधिक चिडचिड होते. पावसाळ्या बाहेर किंवा घरात बनवलेल्या खाद्यापदार्थावर माशांचे वर्चस्व असते. ते अन्नपदार्थ आपण खाल्ल्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. सतत घरात, कानात किंवा कानापुढे या माशा भूनभूनत असतात. त्यासाठी घरात येणाऱ्या माशांपासून कशी सुटका मिळवायला हवी हे पाहूया.

१. आपल्या प्रत्येकाच्या घरात कापूर हा आढळून येतो. माशा घरात सतत येत असतील तर आपण धूपसोबत कापूर जाळावा. कापूरच्या वासाने माशा आपल्या घरात प्रवेश करणार नाही.

२. तुळशी ही अनेक आरोग्याच्या समस्यावर उपयोगी पडते. तसेच तुळशीत असणारे गुणधर्म हे कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतात. घरात तुळशीचे रोप लावल्यास माशा येणार नाही.

३. घरात माशा सतत येत असतील तर घर स्वच्छ ठेवणे देखील गरजेचे आहे. बाजारात फरशी पुसण्यासाठी काही लिक्विड मिळतात आपण त्याचा वापर करुन घर स्वच्छ ठेवू शकतो.

४. पावसाळ्यात दार व खिडक्या शक्यतो बंद करा. पावसाळ्यात (Monsoon) अनेक किटके, डास व माशा घरात येत असतात त्यासाठी खिडक्यांना जाळी लावा. त्यामुळे ते येणार नाही.

५. आपण घरात कडुलिंबाची पाने जाळल्यास किंवा त्याचा धूर केल्यास आपल्याला त्याचा अधिक फायदा होईल व माशा घरात येणार नाही.

६. घरात (Home) अधिक पाणी साठवून ठेवू नका. पाणी साठवलं असेल तर त्यावर झाकण ठेवा. पाणी सांडल्यामुळे किंवा घरातली जागा ओलसर झाल्यामुळे माशा येण्याचे प्रमाण वाढते.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT