Child care : वाढत्या वयात मुलांना पॉर्न बघण्याचे व्यसन लागले आहे? त्यापासून त्यांना कसे दूर ठेवाल ?

सध्याच्या इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या जगात कुठलीही गोष्ट आपल्या सहज मिळते.
Child care, Parenting tips
Child care, Parenting tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्याच्या इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या जगात कुठलीही गोष्ट आपल्या सहज मिळते. संपूर्ण जगाला इंटरनेटच्या विळख्याने गुंफलेल आहे.

हे देखील पहा -

वाढत्या वयात हल्ली मुलांच्या हातात सहज फोन दिला जातो परंतु, आपली मुले फोनवर काय बघतात याचा अंदाज पालकांना जरा देखील येत नाही. इंटरनेटच्या जाळ्यामुळे मुलांना यूट्यूब किंवा पॉर्न साइटवर पॉर्नचे व्हिडीओ सहज पाहता येतात. त्यामुळे एकदा का त्या गोष्टीची सवय लागली की, ती सोडवणे कठीण जाते. पॉर्न हे एक प्रकारची नशाच आहे यापासून मुलांना कसे दूर ठेवता येईल ते पाहूया.

१. मुलांना पॉर्न पाहण्याची सवय लागली असेल तर पालकांनी वेळीच सावध व्हायला हवे. त्यांना ओरडून सांगण्यापेक्षा त्यावर योग्य मार्ग काढा. त्यांना फोन व इतर गोष्टीपासून दूर कसे ठेवता येईल ते पहा.

Child care, Parenting tips
Work stress : कामाचा ताण कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

२. मुलांना पॉर्न पाहण्याची सवय लागली असेल तर पालकांनी व मुलांनी या गोष्टीचा स्विकार करायला हवा. याचे व्यसन सोडण्यासाठी आपली इच्छाशक्ती प्रबळ करा. आपली मानसिक स्थिती मजबूत करा.

३. तसेच पॉर्नची सवय सोडवण्यासाठी पालकांनी मुलांच्या फोनला पॅरेटिंग कंट्रोल करायला हवे. फोनमध्ये व यूट्यूवर याचे ऑप्शन सहज मिळेल. पॉर्न वेबसाइट्स, पॉर्न क्लिप, पॉर्न व्हिडिओ, न्यूड पिक्चर्स यासर्व वेबसाइटला ब्लॉक करा व यापासून मुलांना दूर कसे ठेवता येईल याचा विचार करा.

४. मुलांच्या फोनमध्ये अँटी पॉर्न सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. हार्ड ड्राईव्ह, पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध असलेल्या क्लिप डिलीट करा आणि पॉर्न साइट ब्लॉक करा ज्यामुळे मुलांची ही सवय सुटण्यास मदत होईल.

५. मुलांना मानसिक व शारीरिकरित्या मजबूत बनवा. त्यांना अधिक वेळा (Time) गुंतवूण ठेवण्याचे काम करा. तसेच त्यांच्याकडून योग (Yoga), व्यायाम व मार्शल आर्ट करून घ्या.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com